पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/215

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२०५]

मानवी श्रमाची योग्यता व महत्व कमी होतें. कारण यंत्राच्या साहाय्यानें सृष्टीच्या प्रचंड शक्तीचा उपयोग करून घेतां येऊं लागतो. यंत्रे चालवियास मानवी श्रम लागतात खरे, परंतु अशा श्रमाला विशेष कौशल्याची जरूरी लागत नाहीं. याप्रमाणें उद्योगधंद्यांच्या उलाढालीबरोबर मानवी श्रमाची योग्यता कमी होते व जमीन, भांडवल व शास्त्रीयज्ञान व हीं कारणें एकत्र आणणारी घटनाशक्ति व योजना यांना महत्व जास्त येतें. यामुळें या कारणांच्या मालकांना मिळणारा उत्पन्नाचा मोबदला मोठमेोठा होत जातो व मानवी श्रमाचा मोबदला कमी किंमतीचा बनत जातो व ह्मणूनच मजुरांची स्थिति जितकी चांगली व्हावी तितकी चांगली होत नाहीं. युरोपमध्यें हीच स्थिति जेव्हां घडून आली त्या काळालाच औद्योगिक क्रांतीचा काळ म्हणतात. त्या क्रांतीचें थोडेंसें सिंहावलोकन करणें येथें इष्ट आहे ह्मणजे आपला पुढील मार्ग जास्त सुलभ होईल.
 युरोपमध्यें पूर्वकाळीं बहुतेक सर्व धंदे घरगुती स्थितींत होते. शेतकरी जमीनदारांपासून लहान लहान शेतें खंडानें घेऊन आपल्या व आपल्या कुटुंबांतील माणसांच्या श्रमानें त्या शेताची लागवड करीत. प्रत्येक कामगार आपल्या घरींच आपलें काम करी व जी संपत्ती तो उत्पन्न करी ती शेजारच्या लोकांच्या उपभोगाकरितां करी व जसजशा पदार्थांच्या मागण्या येत त्या त्या मानानें तो माल तयार करी. या काळी दुसऱ्यावर अवलंबून राहणारा व निवळ भाडोत्री असा मजुर वर्ग फारच कमी असे. प्रत्येक मनुष्यावर संपत्तीच्या उत्पत्तीची जबाबदारी असे; व या घरगुती धंद्यांच्या पद्धतींमध्यें संपत्तीची उत्पत्ति बेताबाताची असे व ही संपत्ति बहुधा समतेनें वांटलेली असे, ह्मणजे श्रीमंत व गरीब यांमध्यें फारसें अंतर नसे; सर्वांची राहणी साधारणपणें सारखी व सर्वांचें उत्पन्नही सामान्यतः सारखेंच; थोडाबहुत फरक असावयाचा परंतु तो लक्षांत घेण्यासारखा नव्हता. त्या काळच्या संपत्तीच्या उत्पादनाचा विशेष हा असे कीं, त्याला मनुष्याच्या कौशल्याची व श्रमाची विशेष जरूर असे. संपत्तीच्या उत्पादनास लागणारीं हत्यारें बेताबाताचीं असावयाचीं. परंतु सतराव्या शतकापासूनू युरोपांत अधिभौतिकशास्त्रांचा उदय झाला. अश्रुतपूर्व अशा सृष्टीच्या शक्तीचा शोध लागत चालला व या सृष्टीशक्तीचा यंत्रांच्या साहाय्यानें मानवी धंद्यांत उपयोग करून घेण्याचा