पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/214

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२०४]

म्हणजे या चार वर्गांतील प्रत्येक व्यक्तीचा हेतू आपल्याला मिळेल तितकें जास्त उत्पन्न मिळविण्याचा असतो. परंतु या चढाओढींत मजुरांचा वर्ग हा एका दृष्टीनें फार मोठा असला तरी शक्तीनें तो फार निर्बल असतो व यामुळें चढाओढींत 'गरीबांचा काळ’ या न्यायानें त्यांच्या वांट्यास जितकी संपत्ति यावयास पाहिजे तितकी येत नाहीं. या गोष्टीच्या स्वाभाविक कारणांचा येथें थोडासा विचार करणें अयोग्य होणार नाहीं.
 सर्व देशांत जमीनदारांची स्थिति मोठी स्पृहणीय असते. कारण जमीन ही संपत्तीची फार मेोठी जनयित्री असते व ही जमीन ज्या लोकांच्या हातीं लागते व ज्यांना तिचा मालकी हक्क मिळतो त्या लोकांच्या हातीं एक संपत्तीची गुरु-किल्ली आल्याप्रमाणें होतें व मागाहून समाजांत जन्मास येणा-या लोकांना जमिनीखेरीज तर गत्यंतर नसतें. म्हणजे समाजांतील सर्व लोक गरजू व जमीनदारांच्या ताब्यांत जमिनीचा सर्व पुरवठा या परीिस्थितीमुळें श्रम एवढेंच संपत्तीचें साधन हातीं असणाऱ्या व त्या साधनाचा शेतींत उपयोग करूं इच्छिणारास जमीनदार लोक मागतील तितका खंड देणें भाग पडतें. सारांश, वाढत्या देशांत जमीनदाराचें उत्पन्न वाढत जातें व त्यांची मुस्थितीच होत जाते. मात्र त्या देशांत जमीनीची मालकी खासगी लोकांची पाहिजे. सर्व जमिनीचे मालक जर सरकार असेल तर मात्र लोकांची स्थिति चांगली असेलच असें नाहीं. कारण अशा देशांत जमीनदारांचें उत्पन्न सरकारच घेतें व जर सरकारनें बुद्धिपुरस्सर जमिनी सवलतीच्या दरानें लोकांना जमिनी घ्याव्या लागतात; व अशुा देशांत सरकार अत्यंत श्रीमंत व संपन्न असलेलें व लोक मात्र फार दरिद्री व विपन्नावस्थेमध्यें असलेले असा प्रकार होणें असतें. परंतु ज्या ठिकाणीं जमिनीची मालकी खासगी लोकांकडे आहे तेथें देशाच्या भरभराटीबरोबर जमीनदरवर्गाचें उत्पन्न वाढतें व त्याची आपोआप सुस्थिति होत जाते, हें रिकाडोंच्या खंडाच्या मीमांसेचा विचार करतांना मार्गे सांगितलेंच आहे.
 देशामध्यें संपत्ति वाढूं लागली म्हणजे दरवर्षी बरीच संपति शिल्लक पडत जाते. अर्थात् भांडवलवाल्यांचा वर्गही वाढत जातो, व शास्त्रीय शोधामुळें यंत्रसामग्रीचा विस्तार झाला म्हणजे संपत्तीच्या उत्पादनास भांडवल व यंत्रसामग्री यांची विशेष गरज लागूं लागते व त्या मानानें