पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१९९] प्रत्येक शतक-याशीं निरानराळा करार करून त्याचा शेत-सारा ठरवितें. या पद्धतींत लहान शेताची लागवड करणारे शेतकरी यांचा व सरकारी अंमलदार यांचा प्रत्यक्ष संबंध येतो.जमीनदार किंवा पाटील किंवा पटवारी असा मध्यस्त मनुष्य सरकार व शेत कसणारे यांमध्यें येत नाहीं. या पद्धतीमध्यें ग्रामसंस्था किंवा संघ हैं सरकार ओळखीत नाहीं. तर शेत कसणा-या व्यक्ति फक्त सरकार ओळखतें. वरील विवेचनावरून असें दिसून येईल कीं, वर्गीकरणाचीं हीं दोन्हीं तत्वें एकत्र केली ह्मणजे जमीनधाऱ्याच्या पद्धतीचे एकंदर सहा वर्ग पडतात. ते खालील कोष्टकावरून चटदिशी ध्यानांत येतील.

          जमीनधाऱ्याच्या पद्धति.

कायम'सा-याच्या मुदतीच्या सा-याच्या जमीनदारी, पटवारी,रयतवारी. जमीनदारी, पटवारी,रयतवारी.

    हिंदुस्थानांतील निरानराळ्या प्रांतांत प्रचलित असलेल्या जमीनधाऱ्यापद्धतीचे शास्त्रीय दृष्टीनें पर्यालोचन करूंन वरील वर्गीकरणाचें तात्विक कोष्टक बनविलें आहे. परंतु हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांत प्रायः या सर्व पद्धति आस्तित्वांत आहेत असें मात्र नाहीं. एक पद्धति प्रमुखत्वेकरून एका प्रांतांत प्रचलित आहे तर दुसरी पद्धति दुस-या एका प्रांतांत प्रमुखत्वेंकरून प्रचलित आहे. शिवाय या निरनिराळ्या पद्धतींना निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळीं नांवें आहेत. तेव्हां आतां या तात्विक कोष्टकांत दिलेल्या तात्विक वर्गाना ऐतिहासिक दाखले देऊन हा भाग संपविण्याचा विचार आहे.
 कायम सा-याच्या जमीनदारीचें बंगाल हें माहेरघर आहे. पूर्वकाळीही तेथें सामान्यतः हीच पद्धति प्रचलित होती व इंग्रज सरकारनें बंगाल प्रांत आपले ताब्यांत आल्यावर तीच पद्धति सुरू ठेविली. लॉर्डकार्न्वालीस यानें १७९३ मध्यें हल्ली जिला जमीनदारी म्हणतात ती कायद्यानें चालू केली. देशामध्यें मध्यम स्थितींतील सुखवस्तु वर्ग असणें अवश्य आहे व त्यानेंच