पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१९१] जाणाराच्या तेव्हांच ध्यानांत येतें. प्रेमानें वाढविलेल्या सुंदर बागेप्रमाणें सर्व शेतें दिसतात. जी जमीन अगदीं ओसाड, रेताड व कुचकामाची आहे असें वाटतें अशी जमीन सुद्धां मिराशी शेतकरी दहावीस वर्षांत उत्तम दशेप्रत आणतात. ज्या देशांत ही मिराशी पद्धति चालू आहे तेथें खालीलसारखीं उदाहरणें पुष्कळ वेळां दृष्टीस पडतात. एक अगदीं ओसाड-रेताड जागा किती दिवस तरी पडलेली असावी. पुढें तेथें एक लहानशी झोंपडी होऊन एक दोन गुरें घेऊन एक शेतकरी राहूं लागतो. पहिल्या प्रथम तो या जमिनींत होणारें क्लव्हर नांवाचें गवत त्या ठिकाणीं लावतो. त्यानें गुरांस चारा होऊन या गवताच्या मुळांनीं रेताड जमिनीला थोडासा घट्टपणा येतो. गुरांचे शेणमूत यांचें खत करून तो त्या जमिनींत घालीत राहतो. चांगली माती पाटीपाटीनें आणून तो जमिनींत मिसळतो. याप्रमाणें थोडीशी जमीन सुधारली म्हणजे धान्याचें एखादं हलकें पीक करतो, जमीन आणखी सुधारत चालली म्हणजे थोडीशीं फळझाडे लावू लागतो. त्याचीं गुरेंही वाढत जातात. यामुळे जमिनींत खत जास्त जास्त पडत जातें व जमीन जास्त जास्त सकस बनत जाते. मग तो गहू पेरूं लागतो ॰ व द्राक्षांचें । पीक करूं लागतो. सारांश, सुमारें दहा वर्षांनी जर ती जागा पाहिली तर त्यांतील महदंतर पाहून मनुष्य थक्क होऊन जाईल. ज्याठिकाणीं रेती व खडक यांखेरीज कांहीं एक नव्हते; जेथे स्वाभाविक रीतीनें गवतसुद्धा उगवत नव्हतें अशा ठिकाणीं एका दहाबारा वर्षांच्या अवधींत सुंदर बाग व मळा झालेला दृष्टीस पडतो. परंतु हा सर्व प्रभाव मिरासदारीचा होय. आपण मेहनत केली तर आपल्यालाच त्याचा सर्वस्वी फायदा मिळेल ही खात्री खासगी मालमत्तेच्या भावनेनें उत्पन्न होते. यामुळे असा शेतकरी मनापासून व जीवापाड मेहनत करितो व त्याचें फळ त्याला मिळतें. अशा मिराशी शेतक-याची सांपत्तिक स्थिति पुष्कळच चांगली असते. कांहीं अर्थशास्रकार प्रचंड शेतीची तरफदारी करतांना इंग्लंडांतील शेतकरी व फ्रान्समधील शेतकरी (मिराशी ) यांची तुलना करतात; परंतु ही तुलना बरोबर नाहीं. इंग्लंडांतील शेतकरी हे भांडवलवाले मोठे शेतीचे कारखानदारच होत. हे लोक पुष्कळच श्रीमंत असतात. त्यांच्या तोडीचे फ्रान्समधले मिराशी शेतकरी नसतात हे उघड आहे. परंतु वास्तविक तुलना हे मिराशी शेतकरी व इंग्लंडामधील शेतीकडले भाडोत्री मजूर