पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/198

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१८८]

देणें होय.हाच उपाय सध्यां इंग्रज सरकार योजीत आहे व जमीनदारांकडून सरकाररी पैशानें जमिनी विकत घेऊन त्या कुळाला मिरासदार ह्मणून देत आहे व या कुळांकडून ४०-५० वर्षांच्या अवकाशांत शेताची किंमत हप्त्याहप्त्यानें वसूल करून घेणार आहे. ही नवी पद्धति सर्वत्र सुरू झाली ह्मणजे आयरिश शेतक-यांची दैन्यावस्था नाहींशी होईल यांत शंका नाही.

भाग नववा.

प्रचंड शेती कीं छोटी शेती.

 प्रचंड शेतीची पद्धति चांगली कीं छोट्या शेतीची पद्धति चांगली हा एक अर्थशास्त्रांतील मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. प्रचंड शेतींत १००|२००|४००|५०० अशा एकरांचें एक एक शेत असून तें जमीनदारापासून करारानें घेऊन त्याची लागवड मजुरांच्या श्रमानें शेतकरी करितात. ही पद्धत इंग्लंडात प्रचलित आहे. छोट्या शेतीची पद्धत युरोपांतील इतर देशांत फार प्रचलिंत आहे. यामध्यें शेताचा मालक व शेत कसणारा हे एकच असतात व शेतेंही फार लहान म्हणजे दोन चार एकरांपासून फार झाले तर ५० एकरपर्यंत असतात. यामध्यें शेतकरी आपल्या कुटुंबांतील माणसांच्या व आपल्या स्वतःच्या श्रमानें व आपल्या स्वतःच्या भांडवलानें ती शेताची लागवड करतो. यालाच हिंदुस्थानांत मिरासदार म्हणतात.,br>  प्रचंड शेतीचे फायदे म्हणजे मोठ्या प्रमाणांवर काढलेल्या कारखान्याचे फायदे होत हें नव्यानें सांगण्याचें कारण नाहीं. व लहान प्रमाणावरील कारखान्यापेक्षां मोठ्या प्रमाणावरील कारखान्यांत जीं फायद्याचीं कलमें असतात, ती प्रचंड शेतीमध्येंही असतात.प्रथमतः प्रचंड शेतींत यंत्राचे साहाय्य घेण्यास सांपडतें.लहानशा शेताला वाफेचा नांगर किंवा धान्य कापण्याचें यंत्र किंवा खुरपण्याचें यंत्र याचा उपयोग होत नाहीं.परंतु मोठ्या शेतींत या गोष्टी फायदेशीर होतात.तसेंच यंत्राने चालणारे पाणी काढ-