पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८४]

खंड देऊं लागले. सारांश, या जहागिरीपद्धतींतील लष्करी भाग कालेंकरून नाहींसा होऊन त्याला जमीनदार व कूळ असें औद्योगिक स्वरूप प्राप्त झालें व युरोपांत सध्यां प्रचलित असलेल्या पद्धति या जहागिरीपद्धतीच्या ऱ्हासानंतर त्यांतूनच निष्पन्न झालेल्या आहेत. त्यांचें वर्णन पुढील दोन भागांत करूं.
 दासकृषि किंवा दासकल्पकृषीप्रमाणेंच ही जहागीरपद्धति अर्थशास्त्रदृष्ट्या कमी दर्ज्याचीच आहे. कारण सरदारलोक किंवा त्यांचे हाताखालील मानकरी लोकं यांना आपला लष्करीपेशा आहे असें वाटे. यामुळे त्यांना शेताच्या सुधारणेकडे लक्ष घालणें कमीपणाचें वाटे. प्रत्यक्ष शेत कसणाऱ्यांना सरदार व मानकरी हे बोलावतील तेव्हां त्यांच्या चाकरीस जावें लागे. यामुळें त्यांच्याकडूनही शेताची मशागत चांगली होत नसे. परंतु पहिल्या दोन पद्धतींपेक्षां ही पद्धत किंचित् बरी होती.त्यांतल्या त्यांत जेव्हां जातीनें चाकरी करण्याच्या ऐवजीं पैशाच्या रूपानें स्वामित्वाच्या हक्काबद्दल मोबदला देण्याची पद्धति सुरू झाल्यापासून शेत कसणाऱ्या लोकांना शेतकींत सुधारणा करण्यास सवड झाली.विशेषतः उपोद्घातांत सांगितल्याप्रमाणें धर्मयुद्धाच्या निमित्तानें सरदारांच्या जमिनी व्यापाऱ्यांच्या व मध्यमस्थितींतील लोकांच्या हातांत येऊं लागल्यापासून तर शेतीची सुधारणा जास्त जोरानें होऊं लागली. युरोपांतील निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या परिस्थितींमुळें व निरनिराळ्या कारणांनी जहागिरीपद्धत कालेंकरून नाहींशी झाली. ती कां व कशी हें येथें सांगण्याची जरुरी नाहीं. परंतु त्या पद्धतीच्या नाशाचे परिणाम काय झाले हे पहिलें पाहिजे.
 प्रथमतः सर्व जमिनीचा राजा मालक हि कल्पना जाऊन जमिन खासगी व्यक्तीच्या मालकीच्या हि कल्पना फैलावली. राजा पूर्वी जो खंड घेत असे त्याला जमीनसाऱ्याचें स्वरूप येऊन तो कायमचाच ठरून गेला.कांहीं देशांत सरदारांच्या ताब्यांत त्या जमिनी राहिल्या किंवा मोठमोठ्या जमीनदारांच्या ताब्यांत जाऊन जमीनदार व त्यांचेपासून खंडाने शेते करणारे मोठमोठे शेतकरी असा प्रकार सुरु झाला. यालाच प्रचंड शेतकी म्हणतात.काही देशांत हा सरदारांचा वर्ग नाहींसा झाला व जमिनी कुळाच्या मालकीच्या झाल्या व अल्पशेतकीची पद्धत सुरु