पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/190

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१८०]

गिरी बहुतेक नाहींशी झाली व गुलामगिरीच्या रुढींच्या नाशाबरोबर् दासकृषीची पद्धतिही नाहींशी झाली. शिवाय रोमन पादशाहीचा नाश ज्या उत्तरयुरोपांतील रानटी जर्मन लोकांनी केला, त्यांच्यामध्यें गुलामगिरीच्या प्रघात नव्हता. यामुळे सर्व रोमन साम्राज्यावर जेव्हां हे लाक पसरले व त्यांनीं निरनिराळीं राष्ट्रे युरोपांत निर्माण केलीं, त्यावेळीं रोमन लोकाच्या काळीं प्रचलित असलेली दासकृषिपद्धति स्वाभाविकपणें नाहीशी झाली; व या उत्तरेकडील लोकांमध्यें प्रचलित असलेल्या दासकल्पऋषि व जहागिरीपद्धति प्रचारांत येऊं लागल्या. ही दासकल्पऋषिपद्धति गुलामगिरीसारखीच असल्यामुळे तिचा प्रसार फ्रार जलद्र व सर्व युरोपभर झाला. त्यांतल्या त्यांत पूर्वयुरोपमध्यें तिचा फैलाव विशेष झाला व तेथें ही पद्धति फार काळपर्यंतही टिकली.पश्चिमयुरोपांत जहागिरीपद्धतीचा विशेष फैलाव झाला व त्यामुळे तेथें दासकल्पऋषीने फारसें मूळ धरलें नाहीं. तेव्हां आतां प्रथमतः दासकल्पऋषीचा विचार करूं.
 या पद्धतींतील जमीन कसणारे दासकल्प असत. ते मालकाचे गुलाम नसले तरी मालकाच्या शेतीचे गुलाम असत; ह्मणजे त्यांना मालकाचें शेत सोडून जाता येत नसे. ज्या शेताचे ते शेती समजले जाता असत त्यावर त्यांनीं काम केलंच पाहिजे असा निर्बध असे. तसेच जरी त्यांना खासगी मिळकतीचा अधिकार असे तरी ते पुष्कळ बाबतींत आपल्या मालकाचे तांबेदार असत. आपले तंटेबखेडे मालकाकडूनच त्यांना तॊडवून घ्यावे लागत, तसेंच मुलांमुलीचीं लग्ने करणें याला मालका परवानगी लागे व त्या प्रसंगीं मालकाला कांहीं नजराणा द्यावा लागे. या पद्धतींचा विशेष ह्मणजे हा कीं, मालकांची जमीन हे दासकल्प शेतकरी स्वतःच्या मेहनतीनें कशीत व आपल्या मजुरीबद्दल त्यांना जे जमिनीचा तुकडा दिलेला असे, त्याची लागवड करून ते आपलें पोट भरत. आठवड्यांतून तीन दिवस धन्याच्या शतावर काम करावयाचें व बाकीचे दिवस आपल्या शेतावर काम करावयाचें असा सामान्य नियम साथ नियमांत केव्हां केंव्हा फेरबदल होत असे.तसेच काही विशेष प्रसंगी मालक बोलावील त्या वेळीं त्यांना मालकाच्या कामाकरितां जावें लागे. आणखीही किरकोळ पुष्कळ हक्क मालकाला असत.