पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७]

व्यापाराच्या स्वरूपाचें व पैशाच्या उत्पत्तीचें व कार्याचें मोठे मुद्देसूद व मार्मिक विवरण केले आहे. तसेच झेनाफन् या इतिहासकारानेंही आपल्या ग्रंथांत अर्थशास्त्रविषयक कांहीं बाबींचा विचार केलेला आहे. रोमन लोक शास्त्रांच्या कामांत ग्रीक लोकांच्या पुढें कधींच गेले नाहींत. ग्रीक लोकांनीं मिळविलेलें ज्ञान त्यांनीं आपल्या भाषेत आणिले इतकेंच. यामुळे अर्थशास्त्राला त्यांनीं एकही महत्वाच्या तत्वाची जोड करून दिली नाही यांत कांहीं एक आश्चर्य नाहीं.
 युरोपाचा मध्यकाळ सन ४०० पासून १३०० अखेर किंवा चेौदाव्या शतकाच्या अर्धापर्यंत मानतात. या सुमारास मुसलमान लोकांनीं कॉन्स्टॅटिनोपल हें शहर काबीज केलें व त्यामुळे तेथल्या बादशहाच्या पदरी असलेले ग्रीक व लॅटिन या भाषा अवगत असणारे विद्वान लोक यांचा राजाश्रय नाहीसा होऊन ते लोक सर्व युरोपभर पसरले व त्यांनीं सर्व युरोपभर ग्रीक व लॅटिन भाषा सामान्य जनास शिकविण्याची सुरुवात केली. याच काळाला विद्येच्या पुनरुज्जीवनाचा काळ म्हणतात व येथून अर्वाचीन काळाला प्रारंभ झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. ह्या मध्यकाळांत जरी अर्थशास्त्राचा प्रत्यक्ष उदय झाला नाहीं तरी त्या उदयास अनुकूल अशी परिस्थिति याच काळांत निर्माण झाली. प्रथमतः ग्रीक व रोमन लोकांमध्यें प्रचलित असलेली गुलामगिरी क्रिश्चन धर्माच्या उदार कल्पनांनीं लुप्तप्राय झाली व सर्व धंद्यांना व उद्योगांना एक प्रकारची मान्यता आली. युरोपामध्यें निरनिराळीं स्वतंत्र राज्यें व राष्ट्रे निर्माण झाली. युरोपियन लोकांनीं येशूची जन्मभूमि जेरुसलेम ती मुसलमानांपासून हस्तगत करून घेण्याकरितां कित्येक शतकें धर्मयुद्धे केली. त्यांचा युरोपाच्या उद्योगधंद्यावर व व्यापारउदीमावर चांगलाच परिणाम झाला. प्रथमतः या युद्धाच्या योगानें सरदारांच्या जमिनी मध्यम स्थितीच्या, व उयोगी व भांडवलवाल्या अशा लोकांच्या हातीं आल्या; त्यामुळे शेतकींत सुधारणा होऊं लागली. "दमास्कस येथें धर्मयोद्धयांनीं कापड करण्याचीं व धातूचीं कामें करण्याची कला हस्तगत करून घेतली. रेशमाचा धंदा व रेशमी किडे वाढविण्याची विद्या युरोपांत धर्मयोद्धयांनीं नेली. टायर येथील कारखाने पाहून व्हेनिसच्या व्यापा-यांनीं आपल्या कांचेच्या कारखान्यांत सुधारणा केली." धर्मयुद्धामुळे नौकानयनास व लोकांच्या