पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७१]

वांट्याचें स्वरूप जमिनीच्या खंडाच्या स्वरूपापासून अगदीं भिन्न आहे. देशाच्या भरभराटीबरोबर जमिनीचा खंड वाढत जातो तर व्याजाचा दर कमी होत जातो, व व्याजाचा हलका दर हें एक देशाच्या सुस्थितीचेंच लक्षण आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं.

भाग सहावा.
नफा.

 आतां संपत्तीच्या वांटणीच्या शेवटच्या एका वांट्याचा विचार करावयाचा राहिला. तो वांटा म्हणजे नफा होय. संपत्तीच्या वांटणीमध्यें या वांटयाचें महत्व फार आहे. विशेषत: समाजाची जसजशी उन्नति होत जाते तसतसा हा वांटा फार मोठा होत जातो. संपत्तीच्या उत्पत्तीचें चवथें व शेवटचें कारण म्हणजे योजक किंवा कारखानदार होय. कच्चा माल, श्रम व भांडवल या कारणात्रयीला एकसूत्रांत आणून कारखाना उभारून प्रत्यक्ष संपत्ति उत्पन्न करणें हें काम योजकाचें किंवा कारखानदाराचें आहे. संपत्ती उत्पन्न झाल्यावर ती गि-हाइकाच्या हातीं पाडणें हाही व्यवसाय संपत्तीच्या उत्पत्तीचाच एक भाग आहे असें ह्मणण्यास हरकत नाही. कारण ज्याप्रमाणें रानांत पडून राहिलेल्या जिनसा ह्मणजे अजून प्रत्यक्ष संपत्ति नव्हे; तर ती अनुद्भूत संपत्ति होय. परंतु तीच शहरांत आणली म्हणजे ती संपत्तिस्वरूपाप्रत पावते; त्याचप्रमाणें उत्पन्न केलेली संपत्तीसुद्धां गि-हाइकाच्या दारी आल्याखेरीज उत्पत्नीचें कार्य पूर्ण झालें असें म्हणतां येत नाहीं व गि-हाइकाच्या दारी संपत्ति पोंचविण्याचें ज्याचें काम घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी व फिरते व्यापारी या सर्वांमिळून होतें. तें तसेंच मालाची नेआण करणाच्या निरनिराळ्या साधनांच्या मालकांकडून होतें; व ह्मणूनच या सर्वांचा संपत्तीच्या उत्पाद्कांत समावेश होतो व ह्मणूनच कारखानदार व व्यापारी या दोघांच्या वांट्यांला नफा हें एकच नांव व्यवहारांत देतात व त्याचें शास्त्रीयदृष्ट्याही समर्थन करतां यत