पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/178

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१६८]

त्याचे खालोखाल म्हणजे उत्तम पतीच्या व्यापारी लोकांना ज्या दरानें कर्ज मिळतें तो दर होय. उदाहरणार्थ, हिंदुस्थानांत सरकार हल्लीं ३॥ शेंकडा व्याजानें कर्ज काढतें. परंतु वास्ताविक हिंदुस्थानांत उत्तम हमीचा दर ३|| नाहीं. कारण सरकारी प्रामिसरी नोटा यांवर नेहमीं कसर मिळते. म्हणजे १०० ची नेोट बाजारांत ९५|९६ रुपयांस मिळते, तेव्हां उत्तम हमीच्या कर्जाचा दर हीं हिंदुस्थानांत दर शेंकडा ४ आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं व सामान्य व्यापारी दर शेंकडा ६ आहे असें म्ह्णण्यास हरकत नाही; हा व्याजाचा दर कायम व जास्त काळ टिकणा-या कर्जाचा होय. व हा दर देशांतील एकंदर भांडवलाच्या कमीअधिकपणावर व देशामध्यें मालमत्तेच्या व जीविताच्या सुरक्षितपणावर कांहीं अंशीं अवलंबूल असतो. हा दर देशांत खेळणा-या नाण्यावर अवलंबून नसतो. ज्या देशांत नेहमीं दंगेधोपे होतात; जेथें न्यायपद्धृती चांगली नाही; जेथें करार पाळण्यास लावण्याबदल व कर्ज वगैरे परत मिळण्याबद्दल चांगलीशी व्यवस्था नसते तेथें व्याजाचे दर जबर असतात व सुव्यवस्थित राज्यपद्धतीच्या स्थापनेपासून व्याजाचे दर सैलावत जातात. व सुव्यवस्थित राज्यपद्धतीच्या योगानें देशांत जसजसें भांडवल जमत जातें त्या त्या मानानें व्याजाचा दर कमी कमी होत जातो. हालंडमध्यें एके काळीं देशांत भांडवल व संपत्ति इतकी वाढली होती कीं, व्याजाचा दर दर शेंकडा २ व दोहोंच्याही खाली गेलेला होता. भांडवलाची वाढ कशी होते हें दाखवितांना या गोष्टीचा विचार आधीच झालेला तेव्हां पुन्हां आतां याचा निर्देश करण्याची जरूरी नाहीं.
 व्याजाचा दर व कसरीचा दर यांमध्यें भेद आहे. वर दर्शविल्याप्रमाणें व्याजाचा दर हा देशांतील भांडवलाच्या प्रमाणावर असतो. तें जसजसें वाढेल किंवा कमी होईल तसतसा व्याजाचा दर कमी होईल किंवा जास्त होईल. परंतु बँकेच्या कसरीचा दर मात्र वेळोवेळीं बदलत असतो, व तो नाण्याच्या विपुलतेवर किंवा दुर्मिळतेवर अवलंबून असतो. बँकेमध्यें रोख शिल्लक कमी होत चालली कीं, बँका हुंडीवरील कसरीचा दुर वाढवितात; ह्मणजे तीन महिन्यांनी भरपाई करावयाच्या हुंडीवर तीन महिन्यांचें व्याज कापून त्याब्बद्ल आजची जी रोख रक्कम देत ती या कसरीच्या दरावर अवलंबून असते. कसरीचा दर नाण्याच्या विपुलतेवर अवलंबून असतो.