पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१५७]

मजुरीचा सरसकट दूर वाढला पाहिजे हें उघड आहे. कारण मजुरांना मागणी आहे तितकीच राहिली मात्र पुरवठा कमी झाला; यामुळे मजुरीचे दर वाढलेच पाहिजेत. या विधानाची सत्यता स्थापन करणारीं इतिहासांतलीं पुष्कळ उदाहरणें दाखवितां येतात. इंग्लंडमध्यें जेव्हां प्लेगची सांथ आलेली होती तेव्हां ८|१० वर्षांत इंग्लंडांतील सुमारें अर्थी लोकवस्ती कमी झाली. परंतु त्यायोगानें एकंदर मजुरीच्या दरामध्यें विलक्षण वाढ झाली. यामुळें मजूरलोकांची सांपत्तिक स्थिति सुधारली व एकदां वाढलेल्या मजुरीचा दर कायमचाच झाला. कारण मजुरांची राहणीच जास्त खर्चाची झाली. हल्ली हाच प्रकार हिंदुस्थानांतही घडत आहे. गेल्या दहा बारा वर्षातील प्लेग व दुष्काळ यांनीं लोकसंख्या पुष्कळ कमी झालेली आहे; विशेषतःशहरांत मजूर फारच कमी झाले आहेत व यामुळें मजुरीचे दर भराभर वाढत चालले आहेत. उलटपक्षीं देशांतील भांडवलांत कांहीं आगंतुक कारणांनीं जर एकदम भर पडली व लोकसंख्या तितकीच राहिली तरी सुद्धां मजुरीचा दर वाढलाच पाहिजे. सारांश, मजुरीच्या दराच्या कमीअधिकपणाला वरील दोन कारणें लागू आहेत यांत संशय नाहीं. तरी पण मजुरीच्या वाढीचीं एवढिंच दोन कारणें आहेत असें मात्र नाहीं. शिवाय मजुरीफंडाच्या कल्पनेमध्यें एक प्रकारचा विरोध आहे तोही वस्तुस्थितीस धरून नाहीं. ह्मणजे लोकसंख्या वाढली कीं मजुरी कमी झालाच पाहिजे. तसेंच भांडवल वाढलें ह्मणजे मजुरीचे दर वाढलेच पाहिजेत असा कांहीं सार्वत्रिक नियम नाहीं. मजुरीफंडाच्या पुरस्कर्त्यांनी या कल्पनेला जें एक सार्वत्रिक स्वरुप दिलें ती त्यांची चुकी होती व म्हणून या कल्पनेवर पुष्कळ आक्षेप येऊं लागले व हल्लीं ही कल्पना अर्थशास्त्रांत बहुतेक त्याज्य ठरली गेली आहे.
 या कल्पनेपासून प्रसिद्ध तत्ववेत्ता मिल्ल यानें बरींच अनुमानें काढिलीं आहेत. मिल्लची ही कल्पना व मिल्लचीं भांडवलासंबंधीं प्रमुख तत्वें हीं एकाच तऱ्हेची आहेत. ज्याप्रमाणें त्या प्रमुख तत्वांच्या संरक्षणाविरुद्ध रोंख होता त्याप्रमाणेंच या कल्पनेचाही एक विशेष रोख होता. तो हा कीं, मजुरांची सुस्थिति अगर दैना ही त्यूांच्याच हातीं आहे. ती कायद्यानें, संपानें किंवा दुस-या कृत्रिमू उपायांनी नाहींशी होणारी नाही. कारण एका काळीं मजुरांस यावयाचें भांडवल हैं औद्योगिक नियमानीं ठरलेलें असतें, तें कमीजास्त होणें शक्य नाहीं. तेव्हां मजुरांची संख्या