पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/166

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१५६]

एखाद्या देशांतील मजुरीचा सरासरीचा दर कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो हें प्रथमतः ठरवावयाचें आहे. या बाबतींत निरनिराळ्या देशांत मजुरीच्या दरांत विलक्षण फरक असतो हें वर सांगितलेंच आहे. आता असा फरक कां होतो हे पहावयाचें आहे.
 यासंबंधींच 'मजुरीफंडा’ची कल्पना अभिमत अर्थशास्त्रकारांनीं काढलेली आहे. याचा मथितार्थ असा आहे कीं, देशांतील मजुरीचा दर हा देशांतील भांडवल व लोकसंख्या या दोहोंच्या भागाकाराइतका असती. मजुरीचाचा दर = भांडवल/लोकसंख्या म्हणजे लोक संख्या तितकीच राहून जर मजुरास देण्याचें भांडवल वाढलें तर मजुरीचा दर वाढेल; किंवा भांडवल तितकेंच राहून जर लोकसंख्या वाढली तर मजुरीचा दर कमी होईल,मजुरीफंडाच्या वादाच्या मुळाशीं तीन विधानें आहेत.पहिलें, प्रत्येक देशांत चल भांडवलाची अशी एक ठराविक रक्कम असते कीं ती मजुरींत खर्च झालीच पाहिजे. ही रक्कम कालेंकरून कमी होईल किंवा जास्त होईल. परंतु एका विशिष्ट वेळी ही रक्कम कायमची ठरलेली असते.ती कोणत्याही कारणांनी कमी होणार नाहीं किंवा जास्त होणार नाहीं.
दूसरें, देशांमध्ये अशी लोकसंख्या असते कीं, तिला मजुरीचा दर काहींही असो परंतु मजुरी करूनच पोट भरलें पाहिजे त्याखेरीज गत्यंतर नसतें. तेव्हां ही संख्या एका विशिष्ट वेळी ठरलेलीच असते.
 तिसरें, मजुरीचा दर हा भांडवलवाले व मजूर यांचा आपआपसांतील चढाओढीनेंच ठरला जातो. म्हणजे भांडवलवाल्यांची मजूर मिळविण्याकरिता चढाओढ चालू असते व मजूरदारंची भांड्वलवाल्यांकडे श्रम करून मजुरी मिळविण्याची चढाओढ चालू असते व सर्व मजुरीचे दर अशा दुहेरी चढाओढीने ठरले जातात. या तीन विधानांच्या एकीकरणानें मजुरी फंडाची कल्पना बनलेली आहे. ती ही कीं मजुरीचा दर हा भांडवल व लोकसंख्या यांच्या भागाकारावर अवलंबून असतो.
 'मजुरीफंडा' च्या या कल्पनेमध्यें मजुरीच्या दाराच्या कमी अधिकपणाची दिलेलीं दोन कारणें खरीं आहेत. यांत शंका नाही.कांहीं एका आगंतुक कारणानें देशांतील लोकसंख्या जर एकदम कमी झाली व उद्योगधंदे तेच राहिले म्हणजे देशांतलें भांडवल कायम राहिलें तर