पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/156

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१४६]

जमिनी आहेतत. जोपर्यंत तेथील लोकसंख्येची गरज पहिल्या मगदुराच्या जमिनीवर भागत आहे तोंपर्यंत खंडाचा उदयच होणार नाहीं. परंतु त्या प्रांताची लोकसंख्या वाढली व तिला जास्त धान्य लागू लागलें असतां हें जास्त धान्य दुसऱ्या मगदुराच्या जमिनीच्या लागवडीवांचून मिळणार नाही. आतां पहिल्या मगदुराची जमीन दर एकरीं खंडीभर भात पिकविते व दुस-या मगदुराची जमीन १५ मण पिकविते असें समजा. लोकसंख्येच्या गरजेमुळे १५ मणांची जमीन तर लागवडीस आलीच पाहिजे. तेव्हां पहिल्या जमिनीला आतां ५ मण खंड येऊं लागेल व दुस-या मगदुराची जमीन ही बिनखंडी जमीन होईल. परंतु समजा कीं प्रांताची लोकसंख्या आणखीही पुष्कळ वाढली. तिच्या उपजीविकेकरितां आणखी धान्य अवश्यक झालें आहे. हें धान्य तिस-या मगदुराच्या जमिनीपासून काढणें अवश्य आहे. परंतु ही जमीन दर एकरीं १० मणच धान्य पिकविते. तेव्हां आतां पहिल्या मगदुराच्या जमिनीचा खंड १० होईल. दुस-या मगदुराची जमीन जी आतांपर्यंत बिनखंडी होती तिला आतां ५ मण खंड येईल. याप्रमाणें लोकसंख्येच्या गरजेवर जमिनीच्या लागवडीचें मान अवलंबून आहे; म्हणजे जसजशी देशांतील लोकसंख्या वाढते तसतशी कमी मगदुराची जमीन लागवडीस आणणें अवश्यक होतें. परंतु उत्तम मगदूराची जमीन असो अथवा अगदीं कमी मगदुराची असे त्या जमिनीचें उत्पन्न एकाच तऱ्हेचें असलें म्ह्णजे त्याला बाजारांत सारखीच किंमत येते. मात्र कमी दर्ज्याच्या जमिनीच्या मशागतीस खर्च अधिक येतो व बाजारांतील किंमती निदान शेतक-यांस लागणारा खर्च व त्यांची मजुरी बाहेर पडण्याइतकी पाहिजेच; नाहीं तर शेतकरी ती जमीन लागवडीसच आणणार नाही. ह्मणून बाजारांत जें धान्य येतें त्यापैकी सर्वात वाईट जमिनीच्या धान्याला जो खर्च झाला असेल त्या खर्चावरून धान्याची किंमत ठरते. ह्मणजे धान्याची किमंत बिनखंडाच्या जमिनीच्या लागवडीच्या खर्चाइतकी तरी असलीच पाहिजे; तर ती जमीन लागवडीस येईल. या जमिनीला लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणतात.लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणजे अर्थात् धान्याच्या किंमतीच्या मानानें ज्या जमिनीला लागवडीचा खर्च तितका येतो व ज्या जमिनीवद्दल खंड देतां येत नाहीं. जोपर्यंत तेथील लोकसंख्येची गरज पहिल्या मगदुराच्या जमिनीवर भागत आहे तोंपर्यंत खंडाचा उदयच होणार नाहीं. परंतु त्या प्रांताची लोकसंख्या वाढली व तिला जास्त धान्य लागू लागलें असतां हें जास्त धान्य दुसऱ्या मगदुराच्या जमिनीच्या लागवडीवांचून मिळणार नाही. आतां पहिल्या मगदुराची जमीन दर एकरीं खंडीभर भात पिकविते व दुस-या मगदुराची जमीन १५ मण पिकविते असें समजा. लोकसंख्येच्या गरजेमुळे १५ मणांची जमीन तर लागवडीस आलीच पाहिजे. तेव्हां पहिल्या जमिनीला आतां ५ मण खंड येऊं लागेल व दुस-या मगदुराची जमीन ही बिनखंडी जमीन होईल. परंतु समजा कीं प्रांताची लोकसंख्या आणखीही पुष्कळ वाढली. तिच्या उपजीविकेकरितां आणखी धान्य अवश्यक झालें आहे. हें धान्य तिस-या मगदुराच्या जमिनीपासून काढणें अवश्य आहे. परंतु ही जमीन दर एकरीं १० मणच धान्य पिकविते. तेव्हां आतां पहिल्या मगदुराच्या जमिनीचा खंड १० होईल. दुस-या मगदुराची जमीन जी आतांपर्यंत बिनखंडी होती तिला आतां ५ मण खंड येईल. याप्रमाणें लोकसंख्येच्या गरजेवर जमिनीच्या लागवडीचें मान अवलंबून आहे; म्हणजे जसजशी देशांतील लोकसंख्या वाढते तसतशी कमी मगदुराची जमीन लागवडीस आणणें अवश्यक होतें. परंतु उत्तम मगदूराची जमीन असो अथवा अगदीं कमी मगदुराची असे त्या जमिनीचें उत्पन्न एकाच तऱ्हेचें असलें म्ह्णजे त्याला बाजारांत सारखीच किंमत येते. मात्र कमी दर्ज्याच्या जमिनीच्या मशागतीस खर्च अधिक येतो व बाजारांतील किंमती निदान शेतक-यांस लागणारा खर्च व त्यांची मजुरी बाहेर पडण्याइतकी पाहिजेच; नाहीं तर शेतकरी ती जमीन लागवडीसच आणणार नाही. ह्मणून बाजारांत जें धान्य येतें त्यापैकी सर्वात वाईट जमिनीच्या धान्याला जो खर्च झाला असेल त्या खर्चावरून धान्याची किंमत ठरते. ह्मणजे धान्याची किमंत बिनखंडाच्या जमिनीच्या लागवडीच्या खर्चाइतकी तरी असलीच पाहिजे; तर ती जमीन लागवडीस येईल. या जमिनीला लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणतात.लागवडीच्या धारेवरील जमीन ह्मणजे अर्थात् धान्याच्या किंमतीच्या मानानें ज्या जमिनीला लागवडीचा खर्च तितका येतो व ज्या जमिनीवद्दल खंड देतां येत नाहीं