पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१३०]

विद्यालय काढलीं व जुन्या विश्वविद्यालयांना व्यापारी व धंदेशिक्षणाच्या शाखा जोडल्या. दुसरें अस्त्र संरक्षणाचें. याचा अवलंब करावा किंवा नाहीं याबद्दल अजून इंग्लंडमध्यें एकमत झालें नाहीं. परंतु संरक्षणाचा स्वीकार इंग्लंडनें आतां करण्याची वेळ आली आहे अशी हाकाटी इंग्लंडच्या युनियनिस्ट पक्षानें चालविली आहे व कांहीं कालपर्यंत इंग्लंडांतील लिबरल व युनियनिस्ट या दोन मोठ्या पक्षांमध्यें अप्रतिबंध व्यापाराविरुद्ध सवलतीच्या जकाती अगर संरक्षण हा प्रक्ष मोठ्या कडाक्याच्या वादाचा प्रश्न राहणार यांत शंका नाहीं.
 इंग्लंड देशाची बरोबरी करण्याच्या बुद्धीनें अमेरिकेनें औद्योगिक शिक्षणाकडे लक्ष घातलें, त्याच प्रमाणें अमेरिकेचा अत्यंत मोठा धंदा जो शेतकी त्यामध्येंही त्या देशानें सुधारणा घडवून आणली व शेतकीच्या धंद्याला शास्त्रीय स्वरूप दिलें. ज्याप्रमाणें औद्योगिक कारखान्यांतील यंत्रांच्या शोधांचा मान इंग्लंडला विशेष प्रकारें मिळालेला आहे. त्याप्रमाणें शेतकींतील पुष्कळ नवीन यंत्रे शोधनाचा मान अमेरिकेला मिळालेला आहे. व या शोधांना तेथील परिस्थिति अनुकूलही होती. तो देश अत्यंत सुपीक असून कधींही लागवडीस न आलेल्या अशा हजारों एकरांच्या मोठमोठ्या जमिनी तेथें आहेत. यामुळें स्वाभाविकच तेथें प्रचंड शेतीचा फैलाव जास्त झाला. परंतु अमेरिकेची लोकसंख्या फारच कमी असल्यामुळें तेथल्या शेतीला मोठी अडचण म्हणजे मनुष्याच्या श्रमाची होय. म्हणून तेथें होतां होईल तितकें काम वाफेच्या यंत्रांच्या व इतर नैसगिक शक्तींच्या साहाय्यानें करून घेणें अवश्यक असे; व अशीं यंत्रें शोधून काढण्याकडे लोकांना विशेष मन घालावें लागे व 'गरज ही शोधाची जननी आहे' या म्हणीनमाणणें अमेरिकेमध्येंच शेतकीच्या पुष्कळ यांत्रिक उपकरणांचा शोध लागला आहे. तसेंच अमेरिकेमध्यें पुष्कळ शास्त्रीय नवीन खतांचा शोध लागलेला आहे, व औद्योगिक शिक्षणाचें एक प्रमुख अंग म्हणजे शास्त्रीय शेतकीचें शिक्षण होय असें लोकमत बनलेलें आहे.तिकडे स्वतंत्र शेतकीचीं किती तरी कॉलेजें व शाळा आहेत.
 इंग्लंडमधील व्यापारी व औद्योगिक प्रगति फार प्राचीनकाळापासून झाल्या कारणानें लोक लवकर श्रीमंत होऊन स्वावलंबी झालेले होते व सुधारणा त्यांनी आपआपल्या प्रयत्नांनीं घडवून