पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२]

केला आहे; परंतु हा इतिहास युरोपीय राष्ट्रांमधलाच देणें अपरिहार्य कां आहे हें खालील विवेचनावरून ध्यानांत येईल.
 पाश्चात्य विद्या व वाङ्मय आणि संस्कृत विद्या व वाङ्मय यांची तुलना केल्यास संस्कृतांतील कांहीं उणिवा चटदिशीं ध्यानांत आल्यावांचून राहात नाहींत. आमच्यामध्यें जगाच्या कविमालेमध्यें पहिल्या रांगेत बसण्यायोग्य असे कवी झाले आहेत; सर्व जगांतील सहृदय विद्वान् लोकांनीं ज्यांच्या कृती वाचून आनंदानें माना डोलवाव्या असे नाट्यकार झाले आहेत; ज्यांच्या कांहीं बाबतींतील ज्ञानाबद्दल अजूनही पाश्चात्य लोकांना आश्चर्य वाटतें असे नामांकित गणिती व ज्योतिषी झाले आहेत; ज्यांच्या कांहीं कांहीं वैद्याविषयक उपपत्ति व योजना सुधारलेल्या देशांत अलीकडे पसंत पडत आहेत असे प्रसिद्ध वद्यक ग्रंथकार झाले आहेत. धर्मशास्त्र व वेदांतशास्त्र याबद्दल तर संस्कृत वाङ्मयाचा हात कोणत्याही वाङ्मयाला धरतां येणार नाहीं असें पाश्चात्य राष्ट्रें सुद्धां कबूल करतात. पाश्चात्य वाङ्मयाचा विशेष म्हणजे आधिभौतिक शास्त्रें व तत्संबंधी वाड्मय होय. परंतु अलीकडील शोधावरून रसायनशास्त्रासारख्या शास्त्राचेंही वाड्मय संस्कृतांत आहे असें दिसतें. मात्र इतिहास, राजनीति व अर्थशास्त्र या तीन विषयांसंबंधीं पुष्कळ अंशानें आपल्याला मान खालीं घालावी लागेल, हें कबूल करणें भाग आहे. या तीन विषयांत आमच्या इकडे नामांकित ग्रंथकार झाले नाहींत इतकेंच नव्हे, तर या विद्यांचा व विषयांचा शास्त्रीय व सोपपत्तिक विचारच मुळीं आमच्या पूर्वजांनीं केलेला दिसत नाहीं. आमच्या विस्तीर्ण वाङ्मयप्रदेशांत या तीन विषयांचे भूमिभाग कधींही लागवड न केलेल्या ओसाड जमिनीप्रमाणें आहेत.
 हे प्रांत असे ओसाड कां राहिले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या विषयावर आमच्यांत सर्वमान्य ग्रंथ होते; परंतु काळाच्या प्रचंड ओघांत ते नाहींसे झाले व यामुळेंच ते उपलब्ध नाहींत असें सकृद्दर्शनीं कोणी म्हणेल; परंतु अशी वस्तुस्थिति असती तर बाकी विषयांचे ज्याप्रमाणें थोडे थोडे ग्रंथ राहिले त्याप्रमाणें या विषयाचेही कांहीं कांहीं ग्रंथ राहावयास पाहिजे होते. दुसरें, ही गोष्ट निव्वळ काकतालीय आहे, असें म्हणणें यत्कीस धरून दिसत नाहीं. तसेंच आमच्या हीनबुद्धीमुळें असें झालें असें म्हणावें तर तेंही बरोबर नाहीं. कारण, ज्या आमच्या पूर्वजांनीं आपल्या