पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/139

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[१२९]

कडील ह्मणजे गुलामगिरीच्या विरुद्ध असलेल्या संस्थानांचा विजय होऊन अमेरिकेचे विभाग होण्याचा प्रसंग टळला. याप्रमाणें संयुक्त संस्थानें सर्व तऱ्हेनें व सर्व बाबतींत संयुक्त झाली; व नंतर त्यांनीं उद्योगधंद्यांच्या वाढीकडे आपलें सर्व लक्ष घातलें,व सर्व उद्योगधंद्यांच्या मुळाशीं लोकशिक्षण आहे हें जाणून सामान्य शिक्षणाचा व धंदेशिक्षणाचा झपाट्यानें देशांत प्रसार केला. व या झपाट्याच्या प्रसारामुळें अमेरिका देशानें इतक्या थोड्या अवकाशांत औद्योगिक बाबतींत इंग्लंडच्या पुढें अघाडी मारली. जर्मनीच्या राजकीय फाटांफुटीनें व धार्मिक लढायांनीं जर्मनी युरोपांतील इतर देशांच्या फार मागें पडला होता. परंतु जर्मनीची प्रशियाच्या राजाच्या छत्राखालीं एकी झाल्यापासून देशांतील सरकारनें औद्योगिक वाढीकडे लक्ष घातलें. सरकारला व लोकांना असें दिसून आलें कीं, इंग्लंड देश औद्योगिक बाबतींत फार पुढें आहे व हें त्याचें व्यापारी वर्चस्व बहुत काळाचा परिणाम आहे. परंतु आपल्याला जर हीच प्रगति थोडक्या अवधींत घडवून आणावयाची असेल तर सामान्य शिक्षण व धंदेशिक्षण या दोहोंचा लोकांमध्यें एकसमयावच्छेदेंकरून प्रसार केला पाहिजे. या विचारानें सरकारनें या दुहेरी शिक्षणाकरितां मागेंपुढे न पहातां पाण्यासारखा पैसा खर्च केला, व त्याचीं गोड फळें लवकरच दिसून येऊं लागलीं. देशांत शास्त्रीय ज्ञान व धंद्यांचें ज्ञान मुरत चाललें. शिकलेल्या कारखानदारांचा वर्ग वाढत चालला व त्याबरोबरच देशांत निरनिराळे कारखाने निघूं लागले. परंतु बाल्यावस्थेंत असलेले कारखाने पूर्णावस्थेस पोहोंचलेल्या ब्रिटिश कारखान्यांच्या चढाओढीनें चिरडले जाऊं नयेत, म्हणून अमेरिका व जर्मनी या दोन्ही देशांनीं शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच अप्रतिबंध व्यापाराचें तत्व सोडून संरक्षणाच्या तत्वाचा स्वीकार केला. याप्रमाणें विद्या व कायदा या दोन अस्त्रांनीं अमेरिका व जर्मनी यांनीं आपली औद्योगिक प्रगत करुन घेतली व इंग्लंडच्या पुढें पाऊल टाकण्याच्या तयारीस हीं दोन्हीं राष्ट्रे लागलीं.
 यामुळेच इंग्लंडांतील लोक जागे झाले व आपण या दोन देशांच्या मारगे पडत चाललों कीं काय, अशी त्यांना शंका येऊं लागली व ही शंका येतांच या दोन राष्ट्रांच्या पहिल्या अस्त्राचा इंग्लंडनें ताबडतोब अंगीकार केला, व प्राथमिक शिक्षण सक्तीचें करून धदेशिक्षणाकरितां स्वतंत्र विश्व ९