पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२७]

प्रवृत्ति सोडून दिली पाहिजे व आपले पैसे पेढ्यांमध्यें ठेवण्याची पद्धति सुरू केली पाहिजे. तसेंच नवीन निघणाऱ्या कारखान्यांत-विशेषतः अशा कारखान्यांस सरकारनें ग्यारंटी दिली असतां-घालण्यास तर एका पायावर तयार झालें पाहिजे. देशी भांडवलास उत्तेजन देण्याकरितां सरकारनें देशी रेल्वे कंपन्यांना ग्यारंटीच्या व दुस-या विशेष सवलती देऊं केल्या आहेत व त्यांचा फायदा आमच्या लोकांनीं आपले पुरलेले किंवा डागिन्यांत अद्वातद्वा खर्च केलेले पैसे यांतून पैसे बाहेर काढून अशा धंद्यांत घालण्याचें धाडस केलें पाहिजे. यानें स्वार्थ व परमार्थ किंवा देशकल्याण असे दोन्ही अर्थ साधत आहेत. परंतु असें होण्यास मार्गे सांगितल्याप्रमाणें कारखाने काढणा-यांमध्यें धंद्याचें पूर्णज्ञान, सचोटी व कर्तव्यपरायणता हे गुणही पाहिजेत. ह्मणजे धंदे किफायतशीर होऊन लोकांना धंद्यांत भांडवल घालण्यास उतेजन येईल.

भाग बारवा.
सामान्य व औद्योगिक शिक्षण.

 अर्वाचीन काळीं संपत्तीच्या उत्पत्तीस सृष्टीची शक्ति, भांडवल व श्रम या सर्व कारणांचा बरोबर मिलाफ घडवून आणून संपत्तीच्या उत्पत्तीची, तिच्या विक्रीची वगैरे सर्व धोक्याची जबाबदारी घेणारा योजक अगर कारखानदार हा एक संपत्तीच्या उत्पादक घटकांपैकीं एक महत्वाचा घटकच आहे हें मागें दाखविलें आहे. आतां समाजांतील या वर्गाची वाढ कंशी होते हें या पुस्तकाच्या या शेवटल्या भागांत पहावयाचें राहिलें. या वाढीचें कारण शिक्षण व अनुभव हे होत.
 शिक्षण दोन प्रकारचें आहे-सामान्य व औद्योगिक अगर धदेंशिक्षण. यांतही प्राथमिक व उच्च असे दोन भेद होतात. ह्मणजे प्राथमिक सामान्य शिक्षण व प्राथमिक धंदेशिक्षण. दुसरें सामान्य उच्च शिक्षण व उच्च धंदेशिक्षण. यपैकीं पहिलें सर्व सुधारलेल्या देशांत मोफत व सक्तीचें केललें