पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/128

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[११६]

इतकी काळजी आईबापांना नसते. परंतु मुलाचे दोहोंचे चार हात कधीं होतील ही मोठी काळजी आईबापांना असते व मुलाचें लग्न झाल्यावर नातवाचें तेंड कधीं पाहीन असें त्यांना होऊन जातें. आमच्या समाजांत मुलाच्या शिक्षणाला पैशाची अडचण असतांना त्याकडे कानाडोळा करून मुलाचें आधीं लग्न करून देण्यास तयार असणारे बाप पुष्कळ असतात. अलीकडे हुंडयाचें मान वाढल्यामुळें मुलाचें लग्न करणें हा एक किफायतशोर धंदा होऊं पहात आहे व मुलाची जास्त किंमत येण्याच्या आशेनें कांहीं आईबाप आपल्या मुलाचें लग्न लांबणीवर टाकतात. सारांश, युरोपामध्यें विवाहाचा प्रश्न हा प्रौढ पुरुषांनीं किंवा स्त्रियांनी आपआपल्याबद्दल सोडविण्याचा प्रश्न आहे तर येथें विवाह जमविणें न जमविणें हा आईबापांच्या इच्छेचा व नफ्यातोट्याचा प्रश्न झालेला आहे. तेव्हां लोकसंख्येचे आमच्या समाजांत साक्षात निग्रहच अस्तित्वांत आहेत. प्रतिबंधक निग्रहाला येथें जागाच नाही. सुधारलेल्या देशांत वरच्या वर्गामध्ये या निग्रहाचें प्राबल्य असतें. मात्र कनिष्ट वर्गामध्ये ही भावना वाढवावयाची हें तिकडील समाजसुधारकांचें काम आहे. परंतु आमचे इकडे लग्न करणें हे स्त्रीपुरुषांचें प्रौढ़ वयांत आल्यावर आपल्या इच्छेप्रमाणें करण्याचें कर्तव्यकर्म होय; येथें आईबापांचें कांहीं काम नाही; आईबापांनीं मुलांमुलींना शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यास शिकविलें म्हणजे झालें ही भावना प्रथम उत्पन्न करावयाची आहे व आपल्या बायकोचें व मुलांचें पालनपोषण करण्याचें सामर्थ्य आल्याखेरीच लग्र करणें ही गोष्ट फार अनिष्ट आहे व प्रत्येक मनुष्यानें आपल्या पायावर उभे राहण्यास शिकलें पाहिजे ही भावना सर्व वर्गाच्या लोकांमध्यें उत्पन्न करावयाची आहे. अशा प्रकारची भावना उत्पन्न झाल्यानेंच आमच्या समाजांतील पुष्कळ विपत्ती व दुःखें कमी होणार आहेत. हल्लीच्या आमच्या समाजांत रानटी समाजांतील स्थिति दृष्टोत्पनीस येते.म्हणजे आमच्या समाजांत अन्न व लोकसंख्या यांचें समीकरण साक्षात निग्रहांनीं घडून येत आहे. म्हणूनच मार्गे सांगितल्याप्रमाणें आमच्या समाजांत जननाचें प्रमाण फार आहे. कारण, बालविवाहाचा व प्रत्येक स्त्रीचें लग्न करण्याचा प्रवात जारीनें चालू आहे. मात्र विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नसल्यामुळे लग्न झालेल्या पुष्कळ बायकांना वैधव्यावस्थेंत राहून जुलुमानें आत्मसंयमन अवश्यमेव करावें