पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११४]

समाजापुढें मांडण्याचा होता. त्याच्या मीमांसेचा मथितार्थ इतकाच कीं, मानवी प्राण्यामध्यें ही जी स्वाभाविक लग्नाची इच्छा व तिचा स्वाभाविक परिणाम लोकसंख्यावृद्धि यावर दाब राहिला नाहीं तर लोकसंख्या झपाट्यानें वाढून समाजांत विपत्ति, दुःख, व्यसनें व गुन्हे उत्पन्न झाल्याखेरीच राहणार नाहींत. तरी समाजांतील हे अनर्थ नाहीसे करावयाचे असतील तर ब्रह्मचर्याची कल्पना समाजांत व विशेषतः खालच्या वर्गात प्रचलित झाली पाहिजे. आपल्या कुटुंबाचें व भावी संततीचें पालनपोषण योग्य तऱ्हेने करतां यईल अशा प्रकारची आपली सांपत्तिक स्थिति असल्याखेरीज लग्न करावयाचें नाहीं अशा प्रकारची भावना व तदनुरुप प्रवृत्ति सुधारलेल्या समाजांतील सुशिक्षितांमध्यें व उच्च वर्गामध्यें आधींच उत्पन्न झालेली असते; हीच प्रवृत्ति कामगार व मजूरलोकांमध्यें वाढली पाहिजे; व हें होण्यास सर्व लोकांस शिक्षण फुकट मिळालें पाहिजे व त्यांना चांगलें राहण्याची वासना उत्पन्न झाली पाहिजे; समाजांतील लोकांना सुखी होण्याचा हा खरा मार्ग आहे. संपत्तीची सारखी वांटणी करणें किंवा सरकारी खात्याकडून गरिबास दान देवविणें हें त्यांना सुधारण्याचे खरे मार्ग नव्हेत; एवढेंच मॅलथसचें म्हणणें होतें. लोकांच्या सुखाकरितां देशांतील लोकसंख्या कमीच झाला पाहिजे व माणसानें लग्र करणें व प्रजेात्पादन करणें हें पाप आहे अशा प्रकारचें प्रतिपादन मॅलथसनें कोठेच केलेलें नाहीं. उलट उपजीविकेचीं साधनें वाढतील न्या मानानें लोकसंख्या वाढावी अशी त्याची इच्छा होती. मात्र ही वाढ जन्मास येतील तेवढी मुलें जगून तीं सदृढ निरोगी निपजून व लेाकामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होऊन व्हावी एवढीच त्याची इच्छा होती.
 मॅलथसची मीमांसा ही अर्थशास्त्रांतील एक प्रमुख भाग होऊन बसली आहे. ज्याप्रमाणें अॅडाम स्मिथनें समाजांतील संपत्तीच्या वाढीचीं कारणें शोधून काढून लोकांचें लक्ष तिकडे वेधलें, त्याप्रमाणें मॅलथसनें दारिद्याचें एक कारण शोधून काढून त्याकडे लोकांचें लक्ष वेधविलें व त्यापासून आपला बचाव करण्याचा उत्तम मार्ग कोणता हे दाखविलें. तो मार्ग म्हणजे लोकांच्या स्वाभाविक वासनांची सुधारणा व जास्त उन्नत अशी सामाजिक कल्पना इचा प्रसार होय.
 मॅलथसने आल्या मीमांसेमध्यें ज्या दोन गोष्टी गृहीत धरल्या