पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११२]


स्त्रीपुरुषांमध्यें अनियंत्रित अस्वाभाविक व्यवहार व बाहेरख्याली वगैरेसारख्या व्यसनांचा यामध्यें अन्तर्भाव होती, हीं व्यसनें केव्हां केव्हां अगदीं रानटी समाजांत तर केव्हां केव्हां अगदीं सुधारलेल्या समाजांतही दिसून येतात.
 साक्षात् निग्रह हे हव्या तितक्या कारणांनीं उत्पन्न होतात; यांपेकीं कांहीं स्वाभाविक किंवा सृष्टिनिर्मित होत. जसे दुष्काळ, सांथ, भूकंप, जलप्रलय वगैरें; व कांहीं मनुष्यकृत असतात. जसें लढाया, दंगेधोपे, रोगराई, दुखणेंबाणें व उपासमार. या साक्षात निग्रहांचा समावेश विपति या एका सदरांत होतो. म्हणजे एकंदर पूर्वोत्त तीन निग्रहच शेवटीं कायम ठरतात. पकीं व्यसन व ब्रह्मचर्य हे प्रतिबंधक निग्रह होत व विपति हा साक्षातू निग्रह होय.
 साक्षात् निग्रह व प्रतिबंधक निग्रह यांच्यामध्यें व्यस्त प्रमाण असतें. परंतु त्यांचे परिणाम जी जननमरणसंख्या ती समप्रमाणांत असते. ह्मणजे जेथें जनन जास्त तेथें मरण जास्त व जेथें जनन कमी तयें मरण कमी. जेथें साक्षात निग्रह जास्त प्रमाणांत असतात तेथें प्रतिबंधक निग्रह कमी प्रमाणांत असतात व जेथें साक्षात निग्रह कमी प्रमाणांत असतात तेथें प्रतिबंधक निग्रह जास्त प्रमाणांत असतात. उदाहरणार्थ, ज्या समाजांत दुष्काळ, उपासमार,सांथ व रोग इत्यादि विपत्तीमुळे लोकसंख्येचा नाश फार होत असते त्या समाजांत व्यसन किंवा ब्रह्मचर्य कमी असतें म्हणजे तेथें लग्ने फार लवकर होतात. अर्थात् अशा समाजांत जननसंख्या ही फार मोठी असते, व मरणसंख्याही जबर असते. परंतु ज्या ज्या समाजांत ब्रह्मचर्य पाळल्यामुळे जननप्रमाण फार बेतांत असतें त्या त्या समाजांत मरणसंख्याही पुष्कळ कमी असते.
 मॅलथसची लोकसंख्या-मीमांसा वर वर्णिलेल्या तीन विधानांत आहे. यांपैकी पहिलें बुिधान अगदीं उघड निर्विवाद आहे. दुस-या टोन विधानांचें समर्थन मॅलथसनें निरनिराळ्या देशांच्या व समाजांच्या इतिहासांवरुन केलें आहे व हा प्रत्यक्ष पुरावा व ती गोळा करण्याची खटपट हाच मॅलथसच्या ग्रंथाचा विशेष आहे. अगदीं रानटी स्थितींतील समाजापासून तों युरोपांतल्या अगदीं सुधारलेल्या समाजाचें मॅलथसनें सिंहावलोकन केलें आहे व या प्रत्येक समाजामध्यें अन्न व लोकसंख्या यांच्यामध्येंकोणत्या निग्रहानें समीकरण घडून आलेलें आहे हें त्यानें दाखविलें