पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१११]


 मॅलंथसच्या मीमांसेंतील दुसरें विधान असें आहे. ' सबळ व स्पष्ट अशा निग्रहाच्या अभावीं उपजीविकेच्या साधनांच्या वाढीबरोबर नियतपण लोकसंख्येची वाढ होतेच होते. या विधानास मॅलथस यानें एक महत्वाचा उपाधि जोडला आहे. तो हा कीं, उपजीविकेच्या साधनांची वाढ अगर अन्नाची वाढ सामान्य लोकांपर्यंत पोंचली तरच लोकसंख्या वाढेल. वाढलेलें अन्न कायद्याच्या योगानें किंवा दुस-या कांहीं कारणांनीं श्रीमंत लोकांच्याच हातीं राहून त्याचा दुसरीकडे विनियोग झाला तर या अन्नवाढीचा परिणाम लोकसंख्येवर होणार नाहीं. अन्नाच्या वाढीचा परिणाम होण्यास तें अन्न बहुजन समाजाच्या वांट्याला मजुरीच्या वाढीच्या रूपानें आलें पाहिजे किंवा दुस-या रूपानें बहुजनसमाजाच्या हातीं पडलें पाहिजे; तरच लोकसंख्येच्या वाढीस सुरुवात होईल.
 मेंलथसचें हें विधान पुष्कळ वेळां विसरल गेलें आहे किंवा त्याचा भलताच अर्थ केला गेला आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे उपजीवकेचीं साधनें दुर्मिळ होतात व लोकसंख्येचा मारा त्यावर पडतो असें नव्हे. त्र अन्नाची वाढ झाल्याबरोबर जर सबळ असे लोकसंख्येचे निग्रह अस्तित्वांत आले नाहींत तर लोकसंख्या अवश्यमेव वाढते. तेव्हां लोकसंख्येची वाढ ही लोकसंख्येच्या वाढीस अनुकूल कारणें व प्रतिबंधक कारणें या दोहोंचा एकवटलेला परिणाम होय.
 तिसरें विधान असें आहे, 'लोकसंख्येला उपजीविकेच्या साधनांच्या मयर्देित ठेवणारे सबळ निग्रह ह्मणजे ब्रह्मचर्थ, व्यसन व विपत्नि हे हीत. या निग्रहाचे साक्षातू व प्रतिबंधक निग्रह असे दोन वर्ग करतां येतात. ज्या निग्रहाच्या योगानें लोकांतील मरणांची संख्या वाढून लोकसंख्या कमी होते ते साक्षात् निग्रह होत व ज्या निग्रहाच्या योगानें लोकांतील जननाचें प्रमाण कूर्मी होऊन लोकसंख्या कमी होते ते प्रतिबंधुक निग्रह होत. प्रतिबंधक निग्रहामध्यें ब्रह्मचर्य व व्यसन यांचा समावेश होतो.
 ब्रह्मचर्य ह्मणजे बाहेरख्यालीपणा न करितां लुगऩखेरीज बेंत्स्य राहणें होय. आपल्या कुटुंबाचें व भावी मुलाबाळांचें संगोपन करण्याचें सामथ्र्य येईपर्यत शुद्ध राहून लक्ष लांबणीवर टाकणें याला मॅथलसने ब्रह्मचर्य म्हटलें आहे. आजन्म ब्रह्मचर्य असा त्याचा अर्थ नव्हे. प्रजोत्पति बंद करणारी व्यसनें इतकाच व्यसन याचा संकुचित अर्थ मैंलथसनें केला आहे.