पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११०]


जोडप्यांपासून त्या वसाहतीभर त्यांचा आतां प्रसार झाला आहे. ह्मणजे भूमितिश्रेढीने वाढण्याचें प्रमाण सर्व प्राण्यांत व वनस्पतींत आहे खरें; प्ररंतु मनुष्यप्राण्याच्या वाढीत व त्याच्या वनस्पतीरुप अन्नाच्या वाढीत खालील प्रकारचा विरोध उत्पन्न होतो. जोंपर्यंत लागवड न केलेली जमीन पुष्कळ आह तोपर्यंत अन्न पुष्कळ वाढू शकतें ह्मणूनच नवीन वसाहत झालेल्या अमेरिकेमध्यें लोकसंख्या झपाठयानें बाढ़ली. कारण त्या ठिकाणीं लोकसंख्येच्या वाढीस निग्रह नाहीत; सुपीक जमीन मुबलक, लोकांची राहणी साधी, लोक जास्त शुद्ध व पवित्र, यामुळे तेथें स्त्रीपुरुष वयांत आल्याबरोबर लग्ने होत. कारण संततीच्या जोपासनेची व उपजीविकेची अडचण नव्हती. यामुळे अमेरिकेंत दर पंचवीस वर्षीमध्यें लोकसंख्येची दुप्पट होत असे. कांहीं ठिकाणीं तर दर वीस वर्षानीं किंवा पंधरा वर्षानीं सुद्धां दुप्पट झाल्याचीं उदाहरणें आहेत. यामध्यें मॅलथसनें परदेशांतून येणा-या लोकसख्येची वजावाट करुन तेथील लोकसंख्या वाढत्या प्रमाणानें होत गेली आहे असें अमेरिकेच्या दीडशें वर्षांच्या अनुभवावरून दाखविलें आहे. तेव्हां लोकसंख्येचा निग्रह करणा-या कोणत्याही गोष्टी नसल्या ह्मणजे सामान्यतः दर पंचवीस वर्षांनीं लोकसंख्येची दुप्पट होते असा सिद्धांत निघतो. उदाहरणार्थ, एखाद्या देशांत १ लाख लोक आहेत असें धरलें तर २५ वर्षांनीं ते २ लाख होतील; ५० वर्षांनीं ४ लाख होतील; ७५ वर्षांनीं ८ लाख होतील व १ शतकानें १६ लाख होताल. परंतु इतक्या झपाट्याने अन्न मात्र वाढणार नाहीं. कारण एकतर सुपीक जमीन सर्व पृथ्वीवर मर्यादित आहे व एकंदर जमीनही मर्यादित आहे. ही जमीन वाढविणें शक्य नाहीं. तेव्हां धान्य वाढविण्याचा उपाय ह्मणजे लागवडीस असलेल्या जमिनीचीच जास्त मशागत करून त्यात खतमूत घालून जास्त धान्य उत्पन्न करणें हैं होय. आतां या साधनांनीं धान्याची पैदास जास्त होते खरी. तरीपण ती उतरत्या प्रमाणांत होते. यामुळे वाढत्या लोकसंख्येला अन्नाचा तुटवडा हा पडलाच पाहिजे. ह्मणजे या अन्नाच्या पैदाशींच्या बाहेर लोकसंख्या जाणें शक्य नाहीं देशांत जर लोकसंख्येस पुरेसे धान्य व जीविताचीं इतर साधनें नसली तर मानवी संतति निरोगी व पूर्ण वाढीची होणार नाहीं हैं उघड'आहे .ह्रणजे लोकसंख्येच्या आधीं अन्नाची वाढ झाली पाहिजे.