पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/120

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०८]

हून सर्व जगाला एखादा माल पुरविणें शक्य आहे. दुस-या देशाची चढाओढ बंद झाली व गिरण्या बांधण्यास पुरेसा अवकाश मिळाला ह्मणजे एकटे मॅचेस्टर शहर सर्व जगाला कापड पुरवू शकेलू. तेव्हां शेती व इतर धंदे यांमधील परिमित वाढ व अपरिमित वाढ हा भेद् दृष्टिआड करून चालावयाचें नाहीं व अभिमतपंथी अर्थशास्रकारांच्या सिद्धांताचें व अनुमानाचें हेंच खरें पर्यवसान होय.

भाग दहावा.


लोकसंख्येची वाढ.


 संपत्ताचें दुसरें कारण श्रम. या श्रमांची जसजशी वाढ होईल तसतशी संपत्तीमध्ये भर पडत जाईल हें उघड आहे. परंतु मानवी श्रम वाढण्याचा एक स्वाभाविक मार्ग म्हणजे देशांतील लोकसंख्येची वाढ होय. तेव्हां लोकसंख्येच्या वाढीची मीमांसा काय व त्या वाढीचा देशाच्या सांपत्तिक स्थितीशीं काय संबंध आहे याचें या भागांत विवेचन करावयाचें आहे. अर्थशास्त्रामध्यें या प्रश्नाची भर प्रथमतः मॅलथस या ग्रंथकारानें केली हि या ग्रंथाच्या प्रास्ताविक पुस्तकांतील पहिल्या भागांत सांगितलें आहे व तेथेंच मथलसच्या मीमांसेचा इतिहास दिला आहे. या भागांत या प्रश्नाच, आतां तात्विक दृष्ट्या विचार करावयाचा आहे.
 मॅलथसच्या विवेचनामध्यें त्यानें दोन गोष्टी स्वयंसिद्ध म्हणून घेरल्या आहेत व या दैॉन सिद्धांतांपासून त्याची उपपत्ति ओघानेंच प्राप्त होते असें त्यानें दाखविलें आहे. पहिली गोष्ट ही की, मानवी जीवनास अन्न अवश्य अहिं. मनुष्याचें ज्ञान कितीही वाढलें, त्याची केवढीही सुधारण झाली; त्यानें योगसाधनानें आपल्या मानसिक शक्ति कितीही वाढविल्या तरी मानवी आयुष्यास व मानवी कर्तबगारीस अन्नाची अवश्यक्त आहे हैं निर्विवाद होय. दुसरी गोट लग्न करन्याची प्रवृत्तिही मनुष्यमात्रात सनातन आहे.'आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत्