पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०७]

ज्या देशामध्यें सर्व सुपीक जमीन लागवडीला येऊन तिच्या सुपीकतेची पराकाष्ठा ओलांडून गेलेली आहे, व जेथें वस्ती फारा दिवसांची व फारं दाट आहे अशा देशांना अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांचे सिद्धांत ळागू आहेत. तथें धान्याच्या किंमती-नव्या वसाहतीच्या परदेशांतून धान्य न आल्यास-दिवसेंदिवस वाढत जातील हैं म्हणणें खरं आहे यांत शंका नाहीं. अभिमतपंथी अर्थशास्त्रज्ञांनीं हे नियम प्रतिपादन केले त्या वेळीं त्यांच्या डोळ्यांपुढे इंग्लंडची स्थिति उभी होती ही गेष्ट निर्विवाद आहे.
 त्याचप्रमाणें उद्योगधंद्यांनाही दोन्ही नियम लागू आहेत. ' कांहीं मर्यादेपर्यंत भांडवलाच्या वाढीच्या प्रमाणांपेक्षां पैदाशीच्या वाढीचें प्रमाण जास्त असतें. दोन लाखाच्या कारखान्याऐवजीं चार लारवांचा एक काररवाना काढणें जास्त किफायतीचें आहे हें रवरें; परंतु या काररवान्याच्या वाढीलाही मयदिा आहेच व या मयदेिबाहेर कारखाना गेल्यास देखरेख बरोबर होणार नाहीं, मालाचा नाश होईल व कारखान्याची पैदास खर्चाच्या मानानें कमी होईल. याप्रमाणें अभिमतपंथी सिद्धांतामध्यें पुढील ग्रंथकारांनीं दुरुस्ती केली आहे. अभिमतपंथाचें या सिद्धांताचें प्रतिपादन एककलीपणाचें हातें. ती एककलीपणा काढून टाकून त्याचें यथार्थ रूप पुढील ग्रंथकारांच्या टीकेनें स्पष्ट केलें हें खेरें. तरी पण शेतकी व इतर धंदे यांमधील विरोध विसरतां कामा नये. तो विरोध असा आहे: शेतीची चढत्यापैदाशीची मर्यादा लवकर येते; इतर धंद्यांची ही मर्यादा येण्यास जास्त काळ लागतो हा पहिला विराध. व दुसरा विरोध हा कीं, शेतीला लागणारी जमीन हिची मर्यादा ठरलेली असते; कांहीं केलें तरी देशातील जमीन कांहीं वाढवितां येत नाहीं. यामुळे देशामध्यें जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसा धान्याचा तुटवडा केव्हांना केव्हां तरी भासूं लांगलाच पाहिजे. कारण जमिनीचा विस्तार कांहीं केल्या वाढवितां येत नाहीं. इतर धंद्यांची स्थिति याहून निराळी आहे. मालाला खप असेल व तितक्या वेळाचा अवधि मिळेल तर नवीन कारखाने काढतां येतील. याच गोष्टीचें एका उदाहरणानें स्पष्टीकरण करतां येईल. जमिनीच्या परिमिततेमुळे व उतरत्या पैदाशीच्या नियमानें थोड्या जमिनीपासून सर्व जगाला धान्य पुरविणें कालत्रयींही शक्य नाही; परंतु एखाद्या ठिकाणा