पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/118

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०६]


आधिभौतिक सुधारणा होत चालली म्हणजे संसाराचीं अवश्यी जास्त जास्त महाग होत जातात व सोई व चेनी या मात्र स्वस्त होत जातात. परंतु बहुजनसमाजाच्या नेहमींच्या राहणीमध्यं खचचा मुख्य भागं आवश्यकांचा असल्यामुळे सुधारणेबरोबरच बहुजनसमाजाची राहणी महागाईची झाल्यामुळे जास्त कष्टमयच होत जातेया प्रकारचे अभि मतपंथी अर्थशास्त्रकारांनी या नियमावरून पुष्कळ उपसिद्धांत काढले आहेत. याचा आणखी जास्त ऊहापोह या ग्रंथाच्या बांटणी ’ या भागांत व्हावयाचा आहे; तेव्हां त्याचा येथे विस्तार करण्याची जरूरी नहीं.
 परंतु अभिमतपंथी अर्थशास्त्रकारांचे वरील विवरण चुकीचे आहे निदान त्यामध्ये कांहीं दोष आहेत असे ऐतिहासिकपंथाच्या लेखकांनी दाखवले आहे.
 अधीं शेतकी व इतर उद्योगधंदे यांमध्यें जो विरोध अभिमतपंथी अर्थशास्त्रकारांनी दाखविला आहे तो बरोबर नाही; उतरया व चढत्या पैशचे असे दोन्ही नियम शेतकीस व उद्योगधंयास सारखेच लागू आहेत हें ऐतिहासिकपंथी अर्थशास्त्रकारांनी दाखविलें आहेएक अगदी सुपीक परंतु कधींही लागवड न केलेली जमीन घेतली तर कांहीं कालपर्यंत त्या जामिनलि चढस्या पैदाशीचा नियम लागू पडतो. म्हणजे कांहीं एक भांडवल श्रम जमिनीला लावले व कांहींएक धान्याच व या पैदास झाली व पुढे त्या जमिनीवरील भांडवलाची व श्रमाची दुप्पट केली तर पैदास चैौपट होते. असा क्रम कांह मर्यादेपर्यंत चालतो व मग मात्र उतरत्या पैदाशीचा नियम लागू पडू लागतो. एक म्हणजे प्रत्येक जमिनीची ठराविक पराकाष्ठेची सुपीकता असते. ती पराकाष्ठेची सुपीकता येईपर्यंत त्या जमिनीला चढत्या पैदाशीचा नियम लागू होतो व पुढी उतरत्या पैदाशीचा नियम लागू पडू लागतो. यामुळे नव्या वसाहतींत जसजशी लोकसख्या बाढते व लोकांमध्ये भांडवल वाढते व जसजशी जमिनीचः मशागत जास्त खचची होत जाते, तसतसे धान्याच्या पैदाशीचे प्रमाण जास्त वाढते. अर्थात् धान्याच्या उत्पत्तीचा खर्च कमी होतो व धान्य लोकसंख्यच्या वाढीबरोबर स्वस्त स्वस्त होत जाते. अमेरिकेतील वसाहतीचा अनुभव असाच आहे व म्हणन अमेरिकेत धान्याचे भाव सारखे उतरत आहेत, असे कॅरे या अर्थशास्त्रकाराने अकडयन सिद्ध करून दाखविलें आहे. परंतु