पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१०१]

तर यापासून सामाजिक हितही होतें. तें हैं कीं, अशा संयुक्त भांडवलाच्या धंद्यांत लहानसहान शिलकी घालण्यास बहुजनसमाजाची प्रवृत्ति होते व या योगानें देशामध्यें भांडवलाचा पुरवठा पुष्कळ वाढतो व कोणत्याही नव्या उद्योगधंद्यास भांडवलाचा तुटवडा पडत नाहीं.
 देशामध्यें उद्योगधंदे जर वाढावयाचे असतील तर या संयुक्त भांडवलाच्या तत्वाच्या प्रसाराखेरीज गत्यंतर नाहीं, व या तत्वाचा प्रसार होण्यास बहुजनसमाजाचा या तत्वाच्या यशस्वीपणाबद्दल विश्वास बसला पाहिजे. हा विश्वास बसण्यास संयुक्तभांडवली कारखाने किफायतशीर झाले पाहिजेत व हे धंदे किफायतशीर होण्यास व्यवस्थापक व मॅनेजर व डायरेक्टर लोक यांना आपल्या धंयाची उत्तम माहिती असून शिवाय सचोटी व कर्तव्यदक्षता हे दोन नैतिक गुणही त्यांच्यामध्यें वास करीत असले पाहिजेत; तेव्हां ज्यांना आपल्या देशाची औद्योगिक प्रगति व्हावी असें मनापासून वाटत आहे त्यांनीं युा दोन गोष्टी आपल्या समाजांत वाढतील अशांबद्दल खटपट केला पाहिजे.
 येथपर्यंत उद्योगधंद्यांत विराटस्वरूपी कारखाने संपत्तीच्या वाढीस कसे व कां अनुकूल असतात याचा विचार झाला. या विवेचनावरुन जसजसा श्रमविभागाच्या तत्वाचा फैलाव होतो तसतसा विराट्स्वरूपी कारखान्यांकडे देशांतील उद्योगधंद्यांचा कल असतेी हैं दिसून येईल. अल्पस्वरूपी धंदे विराटस्वरूपी धंद्यांच्या बरोबर अस्तित्वांत असतात खरे, तरी एकंदरीत अल्पस्वरूपी धंद्यांचा विराटस्वरूपी धंद्यांपुढें टिकाव लागणें कठीण, असा सर्व देशांतील अनुभव आहे.
 आतां संपत्तीचा उत्पादक दुसरा मोठा धंदा शेतकी. यासबंधों विराटस्वरूप चांगलें किंवा अल्पस्वरूप चांगलें याचा विचार केला पाहिजे. हा प्रश्न पहिल्यापेक्षां जास्त वादग्रस्त आहे व मोठमोठ्या अर्थशास्त्रकाररांची मतें परस्परविरोधी आहेत.
 प्रथमतः शेतकीमध्यें इतर उद्योगधंद्यांप्रमाणें श्रमविभागाच्या तत्वाच्या प्रसारास फारसा अवकाश नसते. या धंद्यांत प्रत्येक शेतकऱ्याला शतकीचीं बहुतेक कामें यावीं लागतात व करणेंही भाग पडत. सतत बारा महिने बारा काळ एकच काम करण्यास येथे सवड नसते. तरी पण विस्तीर्ण शेती चांगली किंवा अल्प शेती चांगली हा वादाचा मुख्य प्रश्न आहे.