पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९९]

खर्चाची असते, असा सार्वत्रिक अनुभव असल्यामुळें अशीं कामें संयुक्त भांडवलाच्या तत्वावर उभारणें देशाच्या हिताचें असतें. संयुक्त भांडवलाच्या तत्त्वावर उभारलेले धंदे जास्त चिरस्थाई व अपघातापासून मुक्त असतात. खासगी धंद्यांत कर्ता पुरुष नाहींसा झाला तर धंदा तेव्हांच बुडतो. कारण मुलगा त्या कामांत चांगला निघेलच असा नियम नाहीं. परंतु संयुत्क-भांडवली कंपनीला एक मॅनेजर नाहींसा झाला तर दुसरा नेमतां येतो. यामुळे अशा धंद्यास एक प्रकारचा स्थाईकपणा येतो.
 खासगी धंदेवाल्यांस नफ्याची फारहांव असते व पुष्कळ नफा असल्या खेरीज ते आपलें भांडवल एखाद्या धंद्यांत घालीत नाहींत. परंतु संयुक्तभांडवली कंपनीचे भागीदार हे स्वत: धंदे करणारे नसल्यामुळे त्यांना नफ्याची एवढी मातबरी नसते. देशांत जो सामान्यतः व्याजाचा दुर असतो त्यापक्षा थोडा जास्त नफा मिळाला म्हणजे त्यांचें समाधाना असतें. यामुळ नवीन धंदा संयुक्त भांडवलाच्या तत्वावर काढणें सोईचें असतें.
 संयुक्त-भांडवली कंपनीचे जमाखर्च नेहमीं प्रसिद्ध होत असल्यामुळेंही दोन फायदे होतात. प्रथमतः कारभारांत लबाडी होत असेल तर ती लवकर उघडकीस येण्याचा संभव असतो व प्रसिद्ध जमाखर्चावरून देशांतील धंद्याची स्थिति कळण्यासही सुलभ मार्ग होतो.
 संयुक्तभांडवली धंद्याचा आणखीही एक फायदा आहे तो हाच कीं, या धंद्याचें भांडवल थोडया थोड्या प्रमाणानें पुष्कळ व्यक्तींजवळून घेतलेलें असतें. शिवाय या कंपन्यांच्या भांडवलाचा कांहीं भाग न मागितलेला असा असतो. यामुळे धंद्याला एकप्रकारची सुराक्षतता असते व खासगी धंद्यापेक्षां या संयुक्तभांडवली धंद्यास व्यापारांतील अडचणींतून सहज रीतीनें पार पडतां येतें व यदाकदाचित् नुकसान झालें तर तें नुकसानही थोड्या व्यक्तींवर न पडतां पुष्कळजणांवर थोड्या प्रमाणानें वांटून जातें. यामुळें हैं नुकसान फारसें भासत नाहीं.
 परंतु संयुक भांडवलाच्या तत्वाचा सर्वात महत्वाचा फायदा देशांतील भांडवलाची वाढ होय. या तत्वानें जे पैसे व्र जी संपात्ति खासगी व्यक्तींजवळ निरुपयोगी पडून राहिलेली असते. ती एकूब होऊन त्याचें शक्तिमान् असें भांडवल बनतें. ज्याप्रमाणें पाण्याच्या वेगवेगळ्या थेंबामध्यें शात्कि नसते, परंतु हेच थेंब एकत्र जमून त्यांचा प्रवाह वाहूं लागला