पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९८]

जितकी काटकसर करील, व जितक्या दक्षतेनें देखरेख ठेवील तितकी मॅनेजराकडून ठेविली जाणें शक्य नाहीं. यामुळे संयुक्तभांडवली कंपनीच्या कारभारांत जास्त पैसा खर्च होतो, व म्हणून असे धंदे फायदेशीर होत नाहींत; दुसरें, कंपनीचा कारभार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तेथें सरकारी तऱ्हेंनें बादशाही थाटावर सर्व व्यवस्था व खर्च चालतो.
 या दोन दोषांमुळें पुष्कळ धंद्यांत व व्यापारांत संयुक्त भांडवलाचें तत्व फायदेशीर नाहीं असें. अॅडाम स्मिथचें मत झालें होतें. जे धंदे व व्यापार अगदीं नियमबद्ध करून कांहीं एक ठराव रुळीप्रमाणेंच चालावयाचे असतात, अशा धंद्यांत संयुक्त भांडवलाचें तत्व उपयोगी आहे; व या तत्वावर काढलेले धंदे यशस्वी होतात. हे धंदे म्हणजे पेढी, सार्वजनिक दळणवळणाच्या सोयी वगैरे होत. बाकी ठिकाणीं खासगी मालकीचेच धंदे यशस्वी होतात व म्हणूनच असे धंदे चांगले असें अँँडाम स्मिथचें मत होतें.
 हें अँँडाम स्मिथचें मत त्याच्या काळच्या संयुक्त-भांडवली कंपनीच्या अपयशावरून झालेलें होतं; परंतु अर्वाचीन काळीं हें तत्व सर्वसंमत झालेलें आहे. हल्लींचा काळीं व्यापारधंद्यासंबंधीं जर कोणाचीं दोन महत्वाचीं तत्वें असूतील तर ती सुंयुक भांडवलाचें तत्व व परस्परसाहाय्यकारित्वाचें तत्व हींच होत. यांपैकीं दुस-याचा विचार आपल्याला पुढल्या पुस्तकांत करावयाचा आहे, तेव्हां येथें फक्त पहिल्याचेंच विवेचन पुरे आहे. यांपैकीं दुसऱ्याचा विचार आपल्याला पुढल्या पूस्तकांत करावयाचा आहे, तेव्हां येथें फक्त पाहिल्याचेंच विवेचन पुरे आहे.
 संयुक्त भांडवलाचें तत्व हल्लीं सर्वगामी झालेलें आहे व ज्या ज्या देशांनी औद्योगिक बाबतीत प्रगति करून घ्यावयाची आहे त्या त्या देशांनी य तत्वाचा अवलंव केल्यावांचून गत्यंतर नाहीं. कारण या तत्वापासून खालील फायदे होतात.
 कांहीं कामें इतकों प्रचंड व अवाढव्य असतत कीं, तीं खासगी व्यक्तीच्या सांपक्तिक स्मर्थ्याबाहेरचीं असतात. अशा कामांला सरकार किंवा संयुत्क भांड़वल यांखेरीज गत्यंतर नसतें. उदाहरणार्थ, रेल्वे, पाट्रबंधारे, गोदी, बंदराचे धक्के किंवा अशांसारखीं दुसरी व्यापाराच्या सोईचीं कामें सरकारनें तरी हाती घेतलीं पाहिजेत किंवा संयुक्त भांडवलाच्या कंपन्यांनां तरी हातीं घेतलीं पाहिजेत. आतां सरकारी व्यवस्था ही नेहेमीं फार