पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९६]

तितका अमलांत आणावयास सांपडतो. यामुळें मालाची पेैदास अतोनात वाढते.
 मोठ्या कारखान्यांत देखरेखीचा खर्च लहान कारखान्यांपेक्षां कमी होतो. तुमचें एंजिन ५ हार्सपावरचें असो किंवा १० हार्सपावरचें असो; एक एंजिनियर, एक एंजिन चालविणारा, एक म‌‌‍ॅनेजर, एक कॅशीयर पाहिजे, परंतु मोठें एंजिन असल्यानें काम जास्त होतें व म्हणून मालावर देखरेखीचा खर्च कमी हेोतो. तसेंच कापसाच्या गिरण्या ५ लाखांच्या दोन करण्यापेक्षां दहा लाखांची एक करणें हैं किती तरी कमी खर्चाचें होतें. आधीं जाग्याचा खर्च कमी होतो व म्हणूनच लहान प्रमाणावरील कारखान्याचा टिकाव मोठ्या प्रमाणावरील कररवान्यापुढें लागत नाहीं. कारण लहान कारखान्यामध्यें मालाच्या उत्पत्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावरील कारखान्यांपेक्षां जास्त होतो; व म्हणूनच अशा अल्प कारखानदारांना आपला माल विराटस्वरूपी कारखानदारांच्य' मलाइतका स्वस्त देण्यास परवडत नाहीं. यामुळेच मोठे कारखाने व घरगुती किंवा लहान कारखाने यांच्या चाढओढीत दुसऱ्या प्रकारच्या कारखान्यांचा पाडाव होती. हिंदुस्थानांतील सर्व घरगुती धंदे याच कारणांनीं नामशेष झाले. इंग्लंडमध्यें वाफेच्या शक्तीचा शोध लागल्यानंतर वाफेच्या मागांशीं हातमागांचा टिकाव लागेना व म्हणूनच हिंदुस्थानांतील हातमागांचा धंदा हळुहळू बुडत गेला. तीच स्थिात साखरेच्या धंद्याची झाली व तीच स्थिति तैल गाळण्याच्या धंद्याची होत आहे.
 परंतु असे विराटस्वरूपी कारखाने सुरू होण्यास प्रारंभीं भांडवल फार मोठेंच लागतें व असें भांडवल देशांतील एक एका व्यक्तीजवळ फार्स नसतें. यामुळे संयुक्त भांडवलाचें तत्व प्रचंड कृारखान्याच्या पद्धतीबरोबर सर्व सुधारलेल्या राष्ट्रांमध्यें जारीनें अमलांत येऊं लागतें.
 अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपमध्यें उद्योगधंद्यांस व व्यापारास जो जोराची उसळी मिळाली त्या वेळेपासून या संयुक भांडवलाच्या तत्वाचा अंमल सुरू झाला व त्याचा उपयुक्तपणा सर्वसंमत होऊन त्याचा सार्वत्रिक प्रसार झालेला आहे. परदेशांशीं व्यापार करण्याकरितां त्या काळीं ज्या संस्था इंग्लंडमध्यें निर्माण झाल्या त्यांना व्यापारी कंपन्या म्हणत असत. या व्यापारी कंपन्यांना इंग्लंडचे राजे व्यापाराच्या मक्त्याच्या