पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९५]

आहे; नव्हे तो श्रमविभागाचा एक प्रकारचा परिणाम आहे. समाजाची वाढ होत चालली म्हणजे त्या समाजांत सामाजिक श्रमविभाग अगर धंद्याचें पृथक्करण होऊं लागतें. अर्थात् एक मनुष्य व त्याच्या कुटुंबांतील माणसें मिळून एक धंदा करून एक प्रकारचा माल काढूं लागतात. अशाच तन्हेनें समाजांत शेतकरी, सुतार, गवंडी, लोहार, सोनार, परीट वगैरे किती तरी धंदेवाले उत्पन्न होतात. या सांपत्तिक स्थितीला घरगुती कारागिरीचा काळ म्हणतात. या सामाजिक श्रमविभागानें प्रत्येक धंद्य‍‍‌ांच्यां माणसांचें कौशल्य बरेंच वाढतें व त्या योगें संपत्तींत बरीच भर पडते. परंतु औद्योगिक श्रमविभागास सुरुवात झाली म्हणजे तर संपत्तीच्या वाढीस ऊतच येतो. कारण मार्गे सांगितल्याप्रमाणें एका धंद्यामधल्या निरनिराळ्या क्रिया निरनिराळ्या माणसांकडून होऊं लागल्या व विशेषतः ही प्रत्येक क्रिया जलदीनें घडवून आणणारीं यंत्रें निघालीं म्हणजे संपत्तीच्या वाढीस अधिकच जोर येतो; व त्यांत आणखी वाफेच्या व इतर नसर्गिक शक्तीनें यंत्रे चालविण्याचा शोध लागला म्हणजे घरगुती कारखान्य चेिं स्वरूप जाऊन त्या कारखान्यांना प्रचंड विराटरूपी फॅक्टरी व गिरण्या यांचें रूप येतें. युरोपांतील उद्योगधंद्यांची वरप्रमाणेंच वाढ होत आली आहे. हिंदुस्थानांत पूर्व काळीं सामाजिक श्रमविभागाच्या योगानें घरगुप्ती धंदे उत्तम स्थितीत आले परंतु यापुढें मात्र त्यांची वाढ झाली नाही.
 इंग्लंडमध्यें वाफेच्या शक्तीच्या शोधानंतर व एंजिनच्या शोधापासून मोठमोठे विराटस्वरूपी कारखाने प्रथमतः कापसापासून कापड काढण्याचे झाले, व पुढें प्रत्येक धंद्यांत असेच कारखाने, फॅक्टरी व गिरण्या होऊंं लागल्या व हल्लींच्या काळीं विराटस्वरूपी कारखाना हा सामान्य सिद्धांत आहे. अजूनही पुष्कळ धंदे घरगुती स्वरूपाचे आहेत, परंतु ते अपवादादाखल आहेत. हिंदुस्थानांत व नुकत्याच औद्योगिक प्रगतीच्या मार्गाला लागलेल्या जपानांत अजून कारखान्यांचें अल्प स्वरूप नाहींसे झालें नाहीं. अल्प प्रमाणावरील कारखाने हेच येथें सामान्य नियमासारिखे आहेत व प्रचंड कारखाने हे अजून अपवादादास्वल आहेत. मोठ्या प्रमाणावरील कारखान्याचे फायदे अगदीं उघड व ताबडतोब दिसणारे आहेत.
 मोठ्या प्रमाणावरील कारखान्यांचे फायदे अगदी उघड व ताबडतोड दिसणारे आहेत. मोठ्या कारखान्यात नैसर्गिक शक्ति व यंत्रसामग्री यांचा शक्य तितका फायदा घेण्यास सांपडतो व म्हणून श्रमविभागही पाहिजे