पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९३]

श्रमविभागाचे कांहीं तोटेही आहेत हें विसरतां कामा नये व त्याचाही येथें थोडक्यांत विचार करणें जरूर आहे. हे तोटे शारीरिक, मानसिक, नैतिक व सामाजिक आहेत. श्रमविभागाच्या योगानें मजुरांना विशेष प्रकारचे रोग जडतात व प्रचंड कारखान्याच्या पद्धतीपासून मनुष्यजातीची वाढ खुंटली आहे व त्यांना हजारों तऱ्हेच्या व्याधी जडलेल्या आहेत असें ह्मणण्यास पुष्कळ आधार आहे. अर्वाचीन कारखान्याच्या पद्धतींतील हे देष नाहींसे करण्याकरितांच सर्व सुधारलेल्या जगांत कारखान्याचे कायदे झालेले आहेत.
 मानसिक तोटा ह्मणजे कामाची एकतानता-अर्वाचीन काळच्या धंद्यांतला माणूस म्हणजे वर्षानुवर्षे दररोज आठ दहा तास तीच ती एक क्रिया करणारें यंत्र होय. यंत्रसाहाय्यानें संपत्तीची वाढ होते व यंत्र हैं मनुष्याचे श्रम वांचविते हें खरें. तरी पण यंत्र हें " आपल्यासारिखे करिती तात्काळ " या कोटीपैकीं आहे. यंत्र चालविण्यास जेवढी मनुष्याच्या कृतीची जरुरी असते तेवढे कृत्य मनुष्यास सदोदित करावयास लावून मनुष्याला अर्वाचीन सुधारणा ही यंत्र बनविते रसकिन, कारलाईल, वगेरे ग्रंथकारांच्या मतें हल्लीच्या सांपत्तिक युगानें मनुष्याचें सबंध मनुष्यत्व नाहींसें करून त्याचे लहान लहान तुकडे बनविले आहेत. हा तोटा आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु या पृथ्वीवरील सर्व गोष्टींप्रमाणें यालाही दुसरी एक बाजू आहे. मनुष्याला तेंच तें काम करावें लागल्यानें तो मनुष्य यंत्रासारखा जड बनतो अशी समजूत आहे खरी, तरी पण यंत्राच्या योगानें मनुष्याला श्रम व काम कमी पडतें व फुरसत जास्त सांपडते हें खरें आहे; व या फुरसतीमध्यें त्याला ज्ञानानें आपलया मानसिक शक्तीही वाढवितां येण्यास सवड होते हें विसरतां कामा नये. लॅकॅस्टर किंवा मँचेस्टर येथील मजुरांमध्यें वाचनाभिरुचि किती वाढली आहे हैं पाहिले म्हणजे हा तोटा अगदीच केवळ अनिष्टमय आहे असें नाहीं असे दिसून येईल. शहरांत राहणारे मजूर व कामगार हे खेडेगांवांतील लोकांपेक्षा बुद्धीने व चलाखीनें जास्त असतात असा सार्वत्रिक अनुभव अहि. वरील विवेचनावरून या एकतानतेच्या प्रमाणांत फारसा तथ्यांश नाही असें दिसून येईल.
 तिसरा तोटा सामाजिक आहे. श्रमवभागाच्या योगानें लोकसंख्या शहरांत येऊन भरते व शहरांमध्यें स्वाभाविकच खेड्यासारखी