पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/104

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९२]

एक प्रकारचा श्रमविभाग चालू असतो. ह्मणुन सर्व जग हैं संयुक्त झाल्यासरखें झालें आहे. यामुळें एके ठिकाणीं कांहीं फरक झाला कीं, त्याचा परिणाम दुसरीकडे दिसून आल्याखेरीज राहत नाहीं.
 श्रमविभागाचा तिसरा पोटभाग ह्मणजे स्थानिक श्रमविभाग होय. हेही एकप्रकारें सर्वव्यापी तत्व आहे. उष्ण प्रदेशांत कांहीं विशिष्ट माल तयार होतो; तर शीत कटिबंधांत कांहीं एक माल तयार होतो. तसेंच कांहीं प्रदेश किंवा प्रांत यांमध्यें कांहीं कांहीं धंद्यास नैसर्गिक सोई जा स्त अस तात. तेथें तेथें ते धंदे उदयास येतातं. या स्थानिक श्रमविभागाचं सर्वत्र दिसून येणारें उदाहरण ह्मणजे शहर व खेडेगांव यांमधला श्रमविभाग हेोय.शहर हे उद्योगधंदे व कारखाने यांचे मुख्य स्थान असतें.तर खेडे हे शेतकीचं मुख्यस्थान असतें, व शहरातील लोकसंख्येस लागणारी अवश्यकें खेडी पुरवितात तर खेड्यास लागणाऱ्या सोयी व चैनी ही शहरे पुरवितात. असा हा शहर व खेडें यांतला श्रमविभाग देशाच्या एकंदर फायद्याचा, त्याचप्रमाणें दशडेशांमधील स्थानिक श्रमविभागही देशाच्या व जगाच्या फायद्याचाच असला पाहिजे व अप्रतिबंधव्यापाराचें तत्त्व म्हणजे एक श्रमविभागाचेंच तत्व होय, असें पुष्कळांचें म्हणणं आहे. ज्या देशाला जो माल जास्त सुलभ रीतीनं व मुबलक तयार करतां येईल तोच माल तयार करण्यात त्या देशाचा फायदा आहे. अशा देशाच्या इतर गरजा दुस-या देशांनीं पुरवाव्या, असें खुल्या व्यापाराचें तत्व आहे. उदाहरणार्थ,एका देशानें शेतकीकडेच आपला सर्व भर घालावा तर दुसऱ्य देशानें कांहीं विशेष कारखान्याकडेच आपले सर्व लक्ष लावावे. या मध्ये त्या देशाचे काही एक नुकसान न होता एकंदर जागांमध्ये संपत्तीची उत्पत्ती जास्तच झाली पाहिजे; असे पुष्कळ अर्थशास्त्रकारांचे मत आहे परंतु अप्रतिबंधव्यापर विरुद्ध संरक्षण हा बराच वादग्रस्त प्रश्न आहे व त्याचा सविस्तर विचार या ग्रंथाच्या चवथ्या पुस्तकात करावयाचा आहे, तेव्हा या मुद्याचाही विचार त्या वाड्याच्या प्रसंगी करता येईल.
 श्रमविभागाच्या तत्वपासून समाजातील आधिभौतिक प्रगतीस पुष्कळच मदत झालेली आहे , हे वरील विवेचनावरून दिसून येईल. परंतु त्या तत्वाने समाजात काही अनिष्ठेही घडून आलेली आहेत . अर्थात