पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८८]

ओबडधोबड वाटी तयार होते. पुढें ही वाटी एका यंत्राला लावून् तिची कडा साफ व गुळगुळीत केली जाते. वाटी दाबतांना पत्र्याल्या जो खडबडीतपणा आलेला असतो तो एका यंत्रानें साफ केला जातो व शेवटीं ही वाटी चरकावर धरून तिला पालिश आणिले जातें. पत्र्यापासून याप्रमाणें वाटी तयार होण्यास फक्त आठ कृति लागतात व या सर्व यंत्रानें होत असल्यामुळे अत्यंत जलद होतात. यामुळे हीं आठ माणसें एका दिवसति हजारों वाटया तयार करूं शकतात. एकएकटा तांबट या वाट्या करावयास बसला तर त्याच्यानें पांच पंचवीस वाट्या सबंध दिवसांत होण्याची मारामार पडेल. परंतु आठ तांबट जर साध्या हातानें काम करूं लागले तरी त्यांच्या भ्रमविभागानें पूर्वीपेक्षां किती तरी पट काम होईल. दुसरें, आपल्या इकडील श्रमविभागाचें नेहमींचें उदाहरण ह्मणजे गवताच्या गंजी रचण्याचें होय. येथेंही प्रत्येक कामकरी जर एकटा काम करूं लागला तर त्याचे हातून फारच थेडे काम होईल. परंतु गंजी रचतांना मजूर हाताहाताच्या अंतरावर शिड्यांवर हारीनें बसतात व गवताची पेंढी एकाच्या हातून दुस-याच्या हातीं याप्रमाणें काम चालतें. हें काम इतके जलद चालतें कीं, दहा वीस मजूर डोंगराएवढाल्या गंजी हां हां ह्मणतां घालू शकतात. या उदाहरणांत श्रमविभाग व श्रमसंयोग हीं दोन्हींही तत्वें दिसून येतात. गंज रचली जाण्यांत सर्व मजुरांचे श्रमाचा संयोग व्हावा लागतो. परंतु श्रमविभागाच्या रूपानें संयोग झाला ह्मणजे काम फार जलद होतें व तें चांगलेंही होतें.
 संपत्तीच्या उत्पादनाच्या बाबतींत या तत्वाचे फायदे खालील होत.
 पहिला फायदा म्हणजे कामदाराच्या कौशल्याची वाढ हा होय.मअनुष्य तेच तेच काम बारमहा करीत असला ह्मणजे त्याची हातचलाखी विलक्षण वाढते ' सवयीनें पूर्णता येते.' या म्हणीचा हाच अर्थ आहे. रेलावेवरील टेलिग्राफ सिग्नलच्या कामाकडे पाहिलें म्हणजे संवयीनें किती जूलद काम करतां येतें याचा उत्तम प्रत्यय येतो. सिमलर लोक आपण जितक्या जलद बोलतों तितक्या जलद बहुतेक तारा देऊं शकतात .तसेंच संवयीने बाजुच्या पेटीवाल्याला कती विलक्षणहस्तचापल्य येते हे पाहून नेहेमीं सराफाचा धंदा करणाराला रुपये किती जलद मोजतां येतात हें पाहून नवशिक्या माणसाला विलक्षण नवल वाटतें.