पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• माग चवथा. く。 संभाळून इतर गोष्टी साधतील तेवढ्या साधाव्या. त्यांचे मंत घेण्यासारखें वाटेल तेवढे घ्यावें. मतभेद होतोसा वाटल्यास, आपलें मत कां प्रहण करण्यासारखें आहे याबद्दल त्यांची खात्री करावी, व त्यांची अनुकूळता मिळवावी. सुंदर मुलास कुरूप मुलगी-पुष्कळ हुंडा मिळत आहे म्हणून-किंवा-सुंदर मुलास कुरूप मुलगी, कुळशीळ चांगलें आहे म्हणून-करितांना पुष्कळ विचार करावा. म्हाताच्या नवच्यास लहान मुलगी देणे, हा प्रकार निंद्य समजावा. मुलीचा विवाह बापानें कारावा, असें असलें तरी मुलीच्या सुखाकडे मुळींच लक्ष न देतां, कसाबसा नवरा पाहून तिच्या जन्माचे मातेरें करणें, किंवा केवळ खतांस पुष्कळ रुपये मिळत आहेत, म्हणून आंधळे बनून आपल्या कन्येच्या सुखाकडे दुर्लक्ष करणे, चांगलें नाहीं. बापाला मुलीच्या लग्नाकरितां द्रव्य खर्चण्याचे सामथ्र्य नसेल, तर त्यानें आपली मुलगी मोठ्या ठिकाणीं देण्याच्या भरीस पडूं नये; तिच्या लग्नाकरितां कर्ज काढू नये, आपलें घरदार तिच्या भरीस घालं नये; पण मुलीच्या नवच्याचे वित्त त्याच्या मागें आपल्यास मिळेल किंवा आजच तिच्यापासून आपल्यास मोठा लाभ होईल, किंवा आपल्या कुटुंबाचे आजन्म कल्याण होईल, असल्या लोभास गुंतून, म्हाताच्या किंवा जराग्रस्त किंवा अशक्त वराशीं तिचे लग्न सहसा करून देऊं नये. असें करून भवितव्यतेवर रिकामा दोष लादण्यांत कांहीं अर्थ नाहीं. १५ कन्याविक्रय करणें शास्रसंमत नाहीं. पुढील श्लोक पाहा:न कन्यायाः पिता विद्धान् गृण्ह्रीयात् युक्मण्वपि । गृण्ह्ञ्छुङ्गं ह्नि लोभेन स्यान्नरोऽपत्यविक्रयी ॥ मनु-अ. ३ श्लोक. ५१ “विद्वान् (कन्यविक्रयाचा दोष जाणणाच्या) पिलानें (वरापासून ) कन्येचें अल्पसुद्धां मौल्य घेऊं नये. कारण जर मनुष्य लोभानें कन्येचें मौल्य घेईल, तर तो आपल्या अपह्याचा (कन्येचा) विक्रय करणारा असा होतो.”