पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

<o आईबापांचा मित्र. मुलीला नवच्याचे रूप चांगलें असावें असें वाटतें. आईला मुलीच्या नवच्याजवळ (जांवयाजवळ) पैसा पुष्कळ असावा असें वाटतें, व बापाला जांवयाचे कूळ चांगलें असावें असें वाटतें. या श्लोकांत साधारणपणें विवाहांत कोणाचे लक्ष कोणत्या गोष्टींकडे असतें हें सांगितलें आहे. हा सिद्धांत नाहीं, पण यांत बरेंच तथ्य आहे. १३ पाहिल्याबरोबर जर एकमेकांस एकमेकांबद्दल तिटकारा उत्पन्न होऊं लागला, तर पुढील प्रेमवृद्धीस स्थळाचाच अभाव उत्पन्न होईल ! याकरितां वधूवरांच्या सामान्य आवडींचा प्रथम विचार करावा. विशेष प्रकारच्या मनुष्यांचे सर्वच विलक्षण असतें, तें सामान्य मनुष्यांस लावून उपयोगीं नाहीं. देस्दीमोना, अथेल्लीच्या शौर्यावर लुब्ध झाली होती,दमयंती, नळाच्या गुणांवर लुब्ध झाली होती, या गोष्टी खोट्या नाहीत, पण दंपल्यास ‘अनुरूपत्व' ह्या गुण साधारणपणें असला पाहिजे, हें आईबापांनीं प्रथम लक्षांत ठेवावें. आपल्यास साधारणपणे सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. १४ प्रथम रूपाकडे पाहावें. तें उत्तम पाहिजे असें जरी नाहीं, तरी उभयतांस एकमेकांविषयीं प्रथमदर्शनींच अप्रीति उत्पन्न होणार नाहीं, याविषयीं जपावें. वधूवरें लग्नापूर्वी एकमेकांच्या दृष्टीस पडण्याचा योग आणणें, कांहीं वाईट नाहीं, तो अवश्य आणावा. विवाहासारख्या महत्वाच्या बाबीची ठरवाठरवी करतांना घाई करूं नये. विवाह करतांना, विवाहित जोडप्याला सुख व्हावें, हा आईबापांचा प्रधान हेतु असावा. त्यांची आवडनावड कळण्याकरितां प्रयत्न करावे, केवळ आईबापांजवळ पुष्कळ वित्त आहे, किंवा लनति हुंडा पुष्कळ येत आहे, कुळशीळ चांगलें आहे, विहिणींचा *ानपान यथास्थित होईल, असल्या एखाद्या गोष्टीवरच विशेष भर देई नये. ह्या गोष्टींचा विचार करूं नये, असें नाहीं, पण तो करतांना वडवरांच्या साधारण आवडींचा विचार प्रथम मनांत घेऊन, नंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करावा. सर्वच गोष्टी साधतील, असे केव्हांही होणार नाहीं; पण वधूवरांच्या आवडीनिवडींस