पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा- ওৎ ल्यास त्या कन्येविषयीं पुत्रिकाशंका (त्या कन्येस जो पुत्र होईल तो आपली औध्र्वदेहिक क्रिया करणारा होईल, या अभिप्रायानें पित्यानें दिलेली अशी शंका ) उत्पन्न होते. आणि जिचा पिता अज्ञात असेल, तीविषयीं अधर्मशंका (जारजत्वशंका ) उत्पन्न होते. १० यावरून पाहातां विवाहाशिवाय कांहीं तरी मुली राहिल्या पाहिजेत, पण तसा प्रकार आढळत नाहीं. समाजांत अविवाहित पुरुष कोठे क्वचित् आढळतील, पण अविवाहित स्री बहुधा आढळणार नाहीं. मुलीचे लग्न झालेंच पाहिजे, अशी ठाम समजूत झाल्यामुळे, व्यंग मुलींचेही विवाह होतात. यामुळे विवाहाचा खरा हेतु पुष्कळ वेळ बाजूस राहातो. कोठे कोठे पिंपळाशीं किंवा एखाद्या देवाशीं विवाह लावण्याचाही प्रकार दृष्टीस पडतो. वेश्यांत सुद्धां मुलींस धंद्यांत घालण्यापूर्वी, विवाह किंवा विवाहासारखा कांहीं प्रकार करण्याची चाल दृष्टीस पडते. ११ विवाह आईबापांनीं करावा किंवा ज्याचा त्यानें करावा, या प्रश्नाचा विचार करावयाचा म्हणजे कोणत्या विवाहापासून हितकारक परिणाम घडतील हें पाहिलें पाहिजे. ज्या प्रकारच्या विवाहापासून हितकारक परिणाम घडतील, तो विवाहाचा प्रकार चांगला, हें कोणीही कबूल करील. आईवापांनीं मुलांचा विवाह करावयाचा, असें मनांत आणल्यास त्यांनी परिस्थितीचा सर्व बाजूंनीं विचार करावा. कोणत्याही एकाच गोष्टीला नसतें महत्व देऊँ नये. जरूर वाटेल तर, आपल्या अपल्यांचे योग्य तेवढे मत त्या बाबतींत घ्यावें. म्हणजे त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. त्याप्रमाणेच मुलांच्या मनांत आपला आपण विवाह करावा, असें असल्यास त्यांनींही परिस्थितीचा विचार करावा, वडिलांची अनुमति घ्यावी व सारासार विचार करावा, म्हणजे त्यांसही पुढे पस्ताव्यांत पडण्याची पाळी येणार नाहीं. १२ आईबाप केवळ आपला अधिकार म्हणून मुलांचे विवाह करूं लागतील, तर त्यापासून त्यांचे किंवा त्यांच्या संततीचेही हित होणार नाही. ‘कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता कुलं’