पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ు:R आईबापांचा मित्र. रीतीनें वागावें, एकमेकांच्या सहवासानें त्यांच्यांत प्रेम उत्पन्न व्हावें, त्यांनी एकमेकांकरितां झीज सोसावी, दोघांचा एक जीव व्हावा, प्रपंचांत कांहीं वेळ त्यांची गांठ पडली आहे, तोंपर्यंत त्यांणीं एकमेकांकरितां जीव की प्राण करावा. परमेश्वरकृपेनें त्यांस संतति लाभल्यास तिच्यावर त्यांणीं प्रेम करावें, व त्यांच्या संसाराची जुळणी जुळवेल तेवढी जुळवून ठेवावी, पुढे मागें त्यांची तुटातूट होण्याची वेळ ईश्वरेच्छेनें आल्यास, जें मागें राहील त्यानें सद्वर्तनानें राहून मागील कर्तव्यें पुढे चालवावीं, संसारांतील सुखदु:खांचा अनुभव समान भावानें घ्यावा, त्याबद्दल विषाद मार्नू नये, अशारीतीनें तीं वागलीं म्हणजे त्यांनी आपलें गृहसंबंधीं कर्तव्य नीट बजाविलेंसें होईल. या सर्व गोष्टी आपल्या संततीस आपल्या उदाहरणानें शिकवाव्या. हें काम इतरांस व्हावयाचें नाहीं. २९ सार्वजनिक कर्तव्याबद्दल पुष्कळ लोकांची चांगलीशी समजूत झालेली नसते. परंतु दिवसेंदिवस हें अज्ञान आपल्या नाशास कारण होऊ लागले आहे. या वाबतीतलें अज्ञान नाहींसें करण्याचा आईबापांनीं अवश्य प्रयत्न करावा. पूर्वीच्या ग्रामसंस्थांचा इल्लीं लोप झाला आहे. गांवांतील प्रत्येक व्यक्ति हल्लीं पूर्ण खातंत्र्य अनुभवीत आहे. सार्वजनिककाम म्हणजे दहांचे काम, म्हणजे तें कोणाएकाचेही काम नाहीं, अशी हल्लीं समजूत झाल्यासारखी दिसते, ती बरोबर नाहीं. प्रत्येक व्यक्तीचे मत वेगळे. कोणाचें कोणाशीं पटत नाहीं. कोणी कोणाचें ऐकत नाहीं. यामुळे समाजाकडून एकमेकांच्या हिताचे एकही काम होत नाहीं. प्रत्येक गोष्टींत सरकारच्या तोंडाकडे पाहात बसण्याची वाईट चाल लोकांस लागत चालली आहे. सरकारच्या मदतीची अपेक्षा करणें वाईट नाहीं, पण सरकार करील तरच कांहीं होईल, नाहींतर एकही गोष्ट होणार नाहीं, असा प्रकार कांहीं चांगला नाहीं. ३० सरकारास पुष्कळ मोठमोठीं कामें करावयाचीं असतात. आपण एखाद्या कामाची पूर्व तयारी करून, मग सरकारी मदत मागितल्यास सरकारास मदत करण्यासही ठीक पडेल. आपण