पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग तिसरा. ও ২ नवे उपाय शोधून काढण्याकरितां, त्यांस उपाय शोधितां आले पाहिजेत. एका उद्योगांत तनमन घातल्याशिवाय, या गोष्टी साधावयाच्या नाहीत. २७ कोणताही खर्च न पडतां सृष्टीपासून मिळणारें सुख, त्यांस भोगतां आलें पाहिजे. आपलें जन्म केवळ दु:ख भोगण्याकरितां झालें नाहीं, किंवा कसेंतरी फुकट घालवण्याकरितां झालें नाहीं, हें त्यांस कळलें पाहिजे. आपला निर्वाह केला ह्मणजे आपल्या जन्माचे सार्थक झालें, अशाप्रकारचे त्यांचे कोते विचार दूर झाले पाहिजेत. यापेक्षां पुष्कळ गोष्टी आपल्यास करावयाच्या आहेत, असें त्यांस वाटलें पाहिजे. खजन, समाज, देश, राष्ट्र याबद्दल बरोबर कल्पना त्यांच्या मनांत उत्पन्न झाली पाहिजे. त्यांचे हिताहित कोणत्या गोष्टींत आहे, त्या संबंधानें आपलें कर्तव्य काय आहे, तें आपणांस कसें बजावतां येईल, त्याकरितां आपण काय केलें पाहिजे, हें यांस कळलें पाहिजे. खकर्तव्याची पुरती ओळख त्यांस झाली पाहिजे, व तें शक्त्यनुसार बजावण्यास तीं तयार झालीं पाहिजेत. ह्मणजे हें वर्तन किंवा कर्तव्य त्यांच्या मनांत बिंबेल, अशा प्रकारचे शिक्षण त्यांस मिळालें पाहिजे. कोणी यास उदार शिक्षण असें ह्यणतात. ह्मणजे शिक्षणानें मुलांचे मन उदार झालें पाहिजे, व त्यांची प्रवृति सदाचाराकडे झाली पाहिजे. मिल्टन यानें उदार शिक्षणाची व्याख्या अशी लिहिली आहेः-‘ज्या शिक्षणाच्या योगाने मनुष्यास आपलें गृहसंबंधीं व सार्वजनिक कर्तव्य नेकीनें, अकलेनें, आणि उदारबुद्धीनें करितां येईल, त्यालाच पूर्ण आणि उदार शिक्षण ह्मणावें.’ जीवितकर्तव्य-पृष्ठ १३६ पाहा. २८ गृहसंबंधीं कर्तव्य जो तो बजावीत असतोच. पण तेंह जसें हवें तसें थोड्याच ठिकाणीं बजाविलें जातें. संसाररूप रथाचीं स्री आणि पुरुष हीं दोन चक्रे आहेत. तीं संसाराचा गाड़ा ओढीत असतात. पण तो ओढतांना एकाच चाकास जास्त श्रम पडू नयेत, उभय चाकांचे घर्षण होऊं नये. या गोष्टींकडे लक्ष असलें पाहिजे. पति व पत्नी यांणीं एकमेकांस सैौख्य होईल अशा