पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ६९ सिक, वगैरे सर्व शक्तींस उत्तेजन मिळेल, अशी शिक्षणपद्धति असण्याची आईबापांनीं काळजी घ्यावी. २३ व्यवहारांत मनुध्याचा उपयोग होण्यास, त्याच्या सर्व शक्ति दृढ झालेल्या असाव्या लागतात. नुसता सशक्त मनुष्य हमालासारखा राबेल, पण साधारण हिशोब त्यास कळणार नाहीं. नुसता बुद्धिवान मनुष्य ते हिशोब भराभर करील, पण चार कोस चालण्याचा प्रसंग आल्यास त्यास अवघड लागेल; ज्याचे मन विचारानें मोठे झालें नाहीं, त्यास साधारण विप्ने किंवा संसारांतील बारीकसारीक प्रसंगही उद्विग्न करून टाकतील; याकरितां सर्वागपूर्ण शिक्षण मिळण्याची फार जरूर आहे. आतां इतकें जोमाचे शिक्षण सर्वास मिळवितां न आलें, तरी त्यांतलें एकच अंग जोरदार होऊन बाकीचीं अशक्त राहाणे किंवा लुलीं असणें चांगलें नाहीं. याकरितां एखादें अंग जोमदार व बाकीचीं अंगें कार्यक्षम तरी असलीं पाहिजेत. मग जें जोमदार असेल, त्याला अनुकूळ अशा धंद्यांत त्या मुलाला घालतां येईल. म्हणजे तो धंदा ल्यास ताप देणारा होणार नाहीं, सुखकर होईल. धार्मिक बुद्धीच्या मनुष्यास वकीली करावयास लावल्यास, त्याच्या बुद्धीचा उपयोग होणार नाहीं. सर्वच मुलांस एकसारखें शिक्षण देण्यापेक्षां, त्यांच्या शक्तीची पारख करून, योग्य धंद्याकडे त्यांची निवड केल्यास, तें संततीस फायदेशीर झाल्याशिवाय राहाणार नाहीं. २४ हल्लीं सर्व मुलांची शिक्षणपद्धति एकसारखी झाली आहे, ही मोठ्या फायद्याची गोष्ट आहे, असें आरंभीं वाटतें. पण त्यांतही फायद्याबरोबर तोटे आहेतच. प्रारंभींचे सर्व शिक्षण सर्व मुलांचे एकसारखें असलें तरी चालेल, पण तें शेवटपर्यंत एकसारखें असणें कोणत्याही दृष्टीनें हितावह होणार नाहीं. हल्ली, न्हावी, शिंपी, सोनार, कासार, सर्वजण एकसारखें शिकून, आपल्या धंद्यास सारखेच निरुपयोगी बनून, कारकुनीच्या मार्गे एकसारखे लागले आहेत; यामुळे कारकुनीचे महत्व कमी झाले आहे, व खतंत्र व जातीजातीचे धंदे अवनतीस पोचले आहेत. सर्वच मंडळी चाकर,