पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ६७ कडे दवडीत असल्यास तसा वेळ ल्यास दवडूं देऊं नये. त्यास रात्रीं अभ्यासास बसण्यास भय वाटत असेल, तर आपण त्यास सोबत करावी, त्याची करमणूक करावी, त्याला चांगला अभ्यास करण्यास उत्तेजन द्यावें, ह्मणजे त्यास अभ्यास कंटाळवाणा होणार नाहीं. सुशिक्षित आईबापांस, आपल्या मुलांस पाहिजे तेवढी मदत करतां येईल, व ती करण्यास लयांनीं आळस करू नये; मुलांस मदतीची फार अपेक्षा असते. वेळच्यावेळीं केलेली अल्पखल्प मदतही त्यांस फार उपयोगीं पडते. आह्मांस वेळ होत नाहीं, आमचेच काम आह्मांस उरकत नाहीं, अशी पुष्कळ आईबापांची कुरकुर असते, व ती पुष्कळ वेळां खरीही असते; पण आपल्या संततीचे शिक्षण ही फार महत्वाची बाब आहे, संततीचे पुढील आयुष्यक्रमण सुखाचे किंवा दुःखाचें होणें, ब-याच अंशीं या वेळच्या शिक्षणावर अवलंबून असतें, याकरितां त्याची हृयगय करणें चांगलें नाहीं. तें आपलें एक अवश्य कर्तव्य आहे, असें मनांत बाळगून करितां येईल तेवढी मदत आपल्या संततीस करीत जावी; ह्मणजे तें एक आनंददायक कर्तव्य आहे असें लयांस वाटू लागेल, व मुलांच्या संगतींत गेलेला वेळ फुकट गेला नाहीं, सार्थकीं लागला, असें त्यांस वाटल्याशिवाय राहणार नाहीं. २१ मुलांस शाळेतला धडा वाचावयाचा असला, तर तो वाचतांना आपण जवळ बसावें. ती वेडें वांकडें वाचूं लागल्यास त्यांच्या चुका दुरुस्त कराव्या, धडा समजून सांगावा, विशेष गोष्टी कोणत्या, लक्षांत ठेवण्यासारख्या गोष्टी कोणल्या, इकडे त्यांचे लक्ष लावावें. आपल्यास वेळ असेल, व त्यांसही फारसें काम नसेल, किंवा तीं फारशीं थकलेली नसतील, अशा वेळीं आपण त्यांस बोधपर गोष्टी सांगाव्या किंवा वाचून दाखवाव्या, आपल्या पूर्वजांचा इतिहास सांगावा. भारत, रामायण, इत्यादि ग्रंथांतील कथा सांगाव्या. उत्तम उत्तम चित्रे त्यांस दाखवावीं. त्यांची सदभिरुचि जागृत करावी. उत्तम कवि व ग्रंथकार यांच्या चांगल्या चांगल्या कृतीशीं त्यांचा परिचय करून द्यावा. सवड असेल तर त्यांस फिरावयास