पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ आईबापांचा मित्र. त्यांस लागणार, तें सर्व घेण्याचे आपल्यास सामथ्यै नसेल, तर त्या सामानांत निवड करावी, व त्यापैकी विशेष अगल्याचे असेल तें आधीं ध्यावें. शब्दार्थाचीं पुस्तकें व सोडविलेलीं उदाहरणें, असलीं पुस्तकें न घेणें चांगलें. असलीं पुस्तकें घेण्याबद्दल केव्हां केव्हां शिक्षकच आग्रह करितात, असें दिसून येतें, पण तें केव्हांही फायदेशीर नाहीं. शिक्षकानें मुलांस शब्दांचे अर्थ सांगावे, व त्यांनीं ते लिहून घ्यावे. म्हणजे त्यांस शब्द लिहिण्याची संवय होते व शब्द पाठ करण्यासही एक प्रकारची मदत होते. ते शब्द शिक्षकानें तपासून पाहावे, म्हणजे मुलांस शुद्धलेखन सहज कळू लागतें. हे फायदे आयते शब्दार्थ घेतल्यानें होणार नाहीत. सोडवलेली उदाहरणें जवळ असलीं, म्हणजे त्या उदाहरणांच्या रीती पाहण्याकडे सहजच प्रवृत्ति होते, व त्यामुळे खतां कल्पना चालवण्याकडे विद्याथ्यांचे चित्त वळत नाहीं. ते केवळ घोंकीव काम करणारे विद्यार्थी बनतात. उदाहरणांत थोडासा बदल झाला, कीं तें उदाहरण त्यांस येत नाहीं, किंवा शिकलेल्या रीतीही त्यांस वेळेवर हात देत नाहीत. आपलें आपण उदाहरण सोडवण्यांत जो आनंद आहे, त्याचा लाभ त्यांस केव्हांही होत नाहीं, यामुळे एका मोठ्या मानसिक शक्तीची उणीव, त्यांच्या ठिकाणीं उत्पन्न होते. याकरितां सोडवलेली उदाहरणें घेण्याची विद्याथ्यांची प्रवृति अगदीं बंद करावी. इतिहास, भूगोल, व्याकरण, या विषयांचीं टिपणें घेणें, किंवा कवितांच्या अन्वयाथीचीं पुस्तकें घेणे, हेंही याप्रमाणेच वाईट आहे. शिक्षकांनीं ते ते विषय सांगितल्यावर, विद्याथ्र्यानीं अापण खतां त्यांचीं टिपणे आपल्या सोईप्रमाणें तयार केल्यास, ती गोष्ट वेगळी. २० आईबाप सुशिक्षित असीत किंवा नसोत, त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर ठेवतां येईल तेवढी नजर ठेवावी. अशिक्षित असल्यास त्यांस कांहीं शिकवितां येणार नाहीं, व येत नसेल तर त्यांनी शिकवृं नये. पण आपला मुलगा अभ्यास करावयास बसती किंवा नाहीं, यावर नजर ठेवावी. तो आपला वेळ भलती