पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग तिसरा. ৭৩ आहे, व परिस्थिति अशी येत चालली आहे की, उत्तरोत्तर शिक्षणाशिवाय बहुधा कोणाचें चालावयाचेच नाहीं ! याकरितां आईबापांनीं मुलांच्या शिक्षणाकरितां काय करावें, या प्रश्नाचा थोडासा विचार करूं. - ७ शिक्षणासंबंधीं आईबापांचें कर्तव्य काय असावयाचें ! गांवांत जी शिक्षणाची सोय असेल, किंवा जी शाळा असेल, तींत एकदां मुलाचे नांव अडकवून दिलें, त्याला लागणारें सामान घेऊन दिलें, व पुस्तकें पुरविलीं, म्हणजे आपलें काम झालें; अशी बहुधा पुष्कळ आईबापांची समजूंत असते. मग मास्तर जाणे आणि मुलगा जाणे ! फार झालें तर वार्षिक परीक्षा झाल्यावर मुलगा वरच्या इयत्तेंत चढला तर बरेंच झालें, न चढला तर शिक्षकास भेटून साधेल तेवढी खटपट करून त्यास वरच्या इयत्तेत घालावयाचें; जरूर पडल्यास कमी असलेले अभ्यास पुरे करण्याकरितां एखादा खासगी शिक्षक ठेवून द्यावयाचा, किंवा ठेवण्याचे आश्वासन द्यावयाचे; म्हणजे आपलें काम झालें, असें बहुतेक आईबापांस वाटतें. त्यांच्या शिक्षणाबद्दल आणखी कांहीं जबाबदारी आपल्यावर आहे, असें पुष्कळ आईबापांस वाटत नाहीं. कित्येक आईबापांस असें वाटतें, की घरी रिकाम्या वेळीं मुलें उगीच इकडे तिकडे हिंडतात, त्यांस आवरण्याकरितां घरी एखादा पगारी मास्तर ठेवून दिला, म्हणजे झालें आपलें काम ! कितीएक आईवापांस आपल्या मुलांस कांहीं शिक्षण दिलें पाहिजे, अशी कल्पनाच नसते ! ज्याप्रमाणे त्यांचे जन्म झाले आहे, त्याप्रमाणेच त्यांचे शिक्षणही होईल. त्याबद्दल कांहीं वेगळी खटपट करावयास पाहिजे, १ “मुलांच्या खाण्यापिण्यासंबंधानें व लत्त्याकपड्यासंबंधानें काळजी घेतली, व सरकारी किंवा खासगी शाळांत त्यांस फी देऊन पाठविलें, किंवा तशी सवड नसेल, तर त्यांस शिकविण्याकरितां घरीं पगार देऊन शिक्षक ठेविले, म्हणजे आपली मुलांच्या संबंधानें कर्तव्यमयौदा संपली, असा लोकांचा साधारण समज आहे.” आत्मनीतीचीं तत्र्वे-पृष्ठ. १७८