पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग तिसरा. ક૬ चयाचे, व त्यांस विद्यादानही करावयाचें. गुरूंचे आश्रम बहुधा रानावनांत-निदान घडामोडीच्या शहरांपासून दूर-असत. यामुळे तीं ठिकाणें विद्याभ्यासास योग्य अशीं असत. विद्याथ्यांस गुरूंच्या तंत्रानें वागावें लागत असल्यामुळे, गुरूंस विद्याथ्यावर वेगळा दाब ठेवावा लागत नसे. विद्याभ्यास संपेपर्यंत गुरूंच्या आश्रमींच वास असल्यामुळे, विद्याभ्यासास व्यत्यय येण्याची भीति अगदीं नसे. गुरूची शुश्रूषा व विद्याभ्यास हों नेमकीच कामें विद्याथ्र्योस असल्यामुळे, त्यांचा अभ्यास नियमितपणें चालत असे. अशी परिस्थिति असल्यामुळे बापानें मुलाची मुंज लावली,-किंवा गुरूनें लावली,-म्हणजे एकदा मुलास गुरूच्या खाधीन केल्यावर, त्या मुलाची काळजी बापास करावी लागत नसे; तो बोजा गुरूवर असे. विद्याभ्यास पुरा झाल्यावर गुरूनें शिष्यास समावर्तनाची परवानगी द्यावयाची, व मग शिष्यानें विवाह करावयाचा, अशी व्यवस्था असे; यामुळे मुलांच्या शिक्षणाची काळजी बापास करण्याची जरूरी नसे. २ परंतु ही स्थिति पालटल्यास फार वर्षे झाली. यानंतर राज्यक्रांतीच्या अनेक घडामोडींमुळे, अशा विद्या शिकण्याच्या सोई नाहींशा झाल्या. मुलांच्या शिक्षणाची सोय चांगलीशी लागेनाशी झाली. यामुळे बापास जी विद्या येई, तीच परंपरेनें मुलांस व नातवांस येई. अशा स्थितीमुळे ज्योतिषी (जोशी), शास्री, पुराणिक, वैद्य, अशीं पिढीजाद चालणारी घराणीं उत्पन्न झालीं. ३ पुढे तोही काळ पालटला. शिक्षणाची बहुतेक अव्यवस्थाच झाली. ज्यांच्या घराण्यांत पिढीजाद विद्या राहिली, त्यांच्याखेरीज बाकीच्या लोकांस, विद्या बहुधा प्राप्त होईनाशी झाली. गांवांत साधारण लिहिणारा वाचणारा जो असेल, त्यानें शाळा घालावी, व सामान्य लोकांनी आपली मुलें तींत घालावी, असा प्रकार सुरू झाला. या शाळांस ‘तात्या पंतोजींच्या शाळा' असें म्हणत. याखेरीज गांवांत एखादा वैदिक, किंवा शास्रीपुराणिक असल्यास, तो आपल्या घरीं येणाच्या विद्याथ्याँस, फावल्या वेळी त्याला येणारी