पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/66

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


42 आईबापांचा मित्र. परमेश्वरानें तिला अपल्याची जोड कशावरून दिली नसेल ? ज्या स्रिया अपत्यहीन असून पतिविरह अनुभवीत असतात, त्यांच्यापेक्षा आपली स्थिति अधिक सुखकर आहे, असें तिनें मनांत आणावें; च अTपल्या संततीची योग्य जोपासना करण्यांत आपलें आयुष्य खंचीवें. ५० घरांत नवी गाय आणली, म्हणून असें झालें, (एखादें मनुष्य दगावलें); सून केली, तिचा हा पायगुण, असल्या र्शका बिलकूल घेऊं नयेत; व आपल्या मनास उगीच दु:ख करून घेऊं नयेआपल्यावर जे प्रसंग येतील, ते आपले आपण सोसले पाहिजेत. आपल्या कर्तव्यावर नजर ठेवून आपण वागावें म्हणजे झाले. ५१ आपल्यास अनेक मुलें असल्यास त्यांच्यावर आपलें प्रेम एकसारखें असावें. तसें नसलें तरी, होतां होईतों आपण त्यांच्याजवळ समभावानें वागण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर आपल्याच चागणुकीत भद दिसल्यास, सर्वास तो उदाहरणासारखा होऊन, त्याचा परिणाम कुटुंबाच्या नाशास कारण होईल. शेवटी सांगावयाचे इतकेंच की, आईबापांनी आपल्या संततीवर निरपेक्षं प्रेम करावें. आपण व्यवस्थित रीतीनें वागावें. संततीस चांगल्या रीति लावण्याकरितां आपली शिकस्त करावी, म्हणजे ईश्वराच्या कृपेनें त्यांची संतति ल्यांस सुख देणारी निपजल्याशिवाय राहाणार नाहीं. निरपेक्ष प्रेम ईश्वरास सुद्धां आवडतें. यामुळे त्यांचे संततीविषयीं निरपेक्ष प्रेम त्यांस ईश्वराचा मार्गे मोकळा करून देईल. आईबापांनी मुलांशीं कसें वागावें, याबद्दल सुचलेल्या गोष्टी येथवर सांगितल्या. त्यांचे आईबापांनी मनन करून त्याप्रमाणें वागणूक ठेवल्यास, त्यांचा व संततीचा फायदा होईल. भाग तिसरा-मुलांचे शिक्षण. १ प्राचीनकाळीं विद्यादानाची पद्धति आतांच्या सारखी नव्हती. विद्यार्थी गुरुगृहीं राहून विद्या करीत असत, यामुळे ते सर्वकाळ गुरूच्या देखरेखीखालीं असत. गुरूनेंच त्यांचे पालनपोषण रका