पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० आईबापांचा मित्र. हीं दहा वर्षे अत्यंत महखाचीं आहेत. या दहा वर्षात मुलांस रीतीभाती लावावयाच्या, सुशिक्षण द्यावयाचे, त्यांच्यांत सद्गुण उत्पन्न करावयाचे, व सर्वप्रकारच्या सुधारणा त्यांस दाखवून द्यावयाच्या. याकरितां या वयांत शिक्षा केली तरी हरकत नाही, असें कवीचे सांगणे आहे. पण याही वयांत शिक्षा फारशीअगदीं जरूर पडल्याशिवाय-करूं नये, असें वर सांगितलेंच आहे. मुलांचे वय सोळा वर्षाचे झाल्यावर त्यांस मित्राप्रमाणे वागवावें. म्हणजे त्या वागण्यांत श्रेष्ठ कनिष्ठ भाव बेताचा असावा, पण प्रेम जास्त असावें. मर्यादा ही केव्हांही पाहिजेच. पण ती दुजाभाव उत्पन्न होण्यासारखी नसावी. कित्येक करारी आईबापांपुढे उभें राहाणेही मुलांस कठीण वाटतें, मग बोलण्याचे लांबच राहिलें ! इतका परकेपणा काय कामाचा ? सोळा वर्षाचीं मुलें झालीं, म्हणजे त्यस आपलेपणा कळू लागतो. आपण मोठे झालों, असें यांस वाई लागतें. खरा मोठेपणा कशांत आहे, हें त्यांस चांगलेंसें कळत नाहीं; यावेळीं त्यांस तुच्छपणानें वागविल्यास त्यांस बरें वाटत नाहीं. थोडें मानमान्यतेनें वागविल्यास त्यांस बरें वाटतें. त्यांच्यावर कोणत्याही एखाद्या गोष्टीचा परिणाम ताबडतोब होण्याचा संभव असतो. यामुळे तीं बिघडण्याचा पुष्कळ वेळ संभव असतोयाकरितां ह्यांच्याशीं ममतेची वागणूक ठेवल्यास व त्यांस चांगलें बाईट समजून सांगितल्यास, त्या सांगण्याचा परिणाम त्यांच्या मनावर पुष्कळ वेळां चांगला होतो. म्हणून त्यांस मित्रत्वानें वागवावें, असें कवि म्हणतो, पण मित्रत्वानें वागविणें नेहमीं फायद्याचेच आहे हें वर दाखविलेंच आहे. त्यांच्यावर रिकामा दाब वसविण्याच्या भरीस पडू नये. तरुणपणामुळे त्यांची वृत्ति खाभाविक उद्दाम बनलेली असते. ४६ यावेळीं तो त्यांच्या वयाचा दोष असतो. तो हळू हळू संभाळून घेतल्यास नाहींसा करतां येतो. वेगळ्या वेगळ्या वयाच्या आमदानींत वेगळीं वेगळीं देहाचीं खरूपं बनतात, त्याप्रमाणे मनाच्या वृतिही बदलतात. त्या खाधीन ठेवावयाच्या असल्यास