पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माग दुसरf- ४६ ४४ मुलें वाढत चाललीं ह्मणजे आपल्या वयाप्रमाणे आपल्यास मान मिळावा, असें त्यांस वाटत असतें. अशा वेळीं-जरी तीं आपलीं मुलें असली तरी-त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांस वागवावें. लहानपणीं आपण मुलांस जसें वागविलें तसेंच वांगवू नये. लहानपणीं ‘राम्या' ह्मटलें ह्मणून नेहमीं तसेंच ह्मणावें, असें नाहीं. राम्र, रामभाऊ, किंवा असाच दुसरा कांहीं बदल त्यांत करण्यास हरकत नाहीं, इतकेंच नव्हे, पण बदल करणें इष्टही आहे. हानपणीं सुद्धां ‘राम्या' ह्मणणें चांगलें नाहीं, पण तसा पाठ असल्यास तो पुढे बदलून चांगल्या शब्दानें त्यांस संबोधणे इष्ट आहे. आईबापांचा अपमान करावा, त्यांस त्रास द्यावा, असा संततीचा विचार नसतांही केव्हां केव्हां गैरसमजानें यांच्या हातून तशा गोष्टी घडतात. त्यावेळीं सोईच्या वाटेनें मुलांची चूक त्यांच्या लक्षांत आणून द्यावी, ह्मणजे त्यांची चूक ल्यांस समञ्जून त्यांच्या वर्तनांत सुधारणा होईल. आईबापं वयानें मोठी असल्यामुळे त्यांचा अनुभवही मोठा असतो, संतति अल्पवयी असल्यामुळे त्यांस फारसा अनुभव नसतो, याकरितां संततीच्या चुका होणें खाभाविक असतें. त्यांच्या चुकांबद्दल न रागावतां त्यांची कांव करावी, व होतां होईतोंपर्यंत त्यांच्या चुका उपदेशानें सुधारण्याचा प्रयत्न करावा. सुधारणा करतांना केव्हां केव्हां आपल्यास पुष्कळ कष्ट पडतील, पण आपल्या कर्तव्यावर लक्ष ठेवून आपण ते सोसावे व संततीस शहाणे करून सोडावें. ४५-‘लालयेत् पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् ॥ प्रासे तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ॥ हा श्लोक एका पूर्व कवीचा आहे, तो विचारणीय आहे. पांच वर्षे ह्मणजे अगदीं अज्ञान दशेतील. या पांच वर्षात मुलांस कांहीं कळत नसतें. याकरितां त्यांचे लाड करावे, असें कवि ह्मणतो, पण ते लाडही बेताचे करावे, हें मार्गे सांगितलेंच आहे. दहा वर्षे मुलांस शिक्षा करावी, ह्मणजे शिक्षण द्यावें, व तें देतांना " शासन करावें लागलें तरी चिंता नाहीं, असें कवि सांगतो, कारण 년