पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/6

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


Y: पावलीं आहेत, ते असें ह्मणणार नाहींत, पण अद्याप आपल्याकडे अशा लेोकांची संख्या फार थोडी आहे. ९ कलियुग बिचारं काय करणार? तें का सजीव आहे ! त्यांत जीव घालण्याचे किंवा त्यांतील जीव-तें सजीव असल्यास-काढून घेण्याचे आपल्या स्वाधीन आहे. आपण प्रयल केले तर कलियुगाला सत्ययुग वनवृं! आमच्या लोकांनीं सोन्याच्या लगडी व रत्नांच्या राशी आपल्या घरांत खचून भरून ठेविल्या होत्या-व अद्यापही कोठे कोठे असतील, त्यांनीं आमचे काय हित केलें ? नुसत्या नेत्रेद्रियास तृप्त करण्याखेरीज लांच्यांत काय सामथ्र्य आहे? त्या पार कोणीकडल्या कोणीकडे निघून गेल्या ! हिंदुस्तानाला-सोन्याचा किनारा-ह्मणून भूषविणारे लोकच हृल्लीं त्याला-दरिद्री लोकांचा देश-असें ह्मणू लागले आहेत. एखादा दुष्काळाचा हल्ला देशावर आला, ह्यणजे आमच्या तोंडचे पाणी पळून जातें ! मार्गे आमच्या देशांत अनेक दामाजी उत्पन्न होऊन, दुष्काळाशीं तोंड देऊन, गरीबगुरिबांचे प्राण वांचवीत असत. हल्लीं गरीबगुरिबांचे रक्षण सरकारी मदतीशिवाय आमच्यानें होत नाहीं. अनाथ लोकांचे कळप मिशनरीच्या गोटांकडे धावू लागले, तरी त्यांस मदत करण्याचे सामथ्र्य आमच्यांत नाहीं. आमचे स्वतांचे रक्षण कसे होईल, या काळजीनें जर आमचा ऊर दडपून जातो, तर इतर लोकांच्या सुखदुःखाचा विचार आमच्या मनांत कोठून शिरणार ! १० इंग्लंड देशाकडे लक्ष दिल्यास निराळाच प्रकार दृष्टीस पडतो. ज्या वेळेस आमचा देश वैभवाच्या शिखरावर वसला होता, त्या वेळेस इंग्लंड देश केवळ दरिद्री होता. पण त्या देशांतील लोकांच्या दीर्घे प्रयलानें, तो आज लक्ष्मीचे माहेरघर बनला आहे. त्यांनी आपल्या कोलशांच्या खाणींपासून-उद्योगरूपी किमयाच्या मदतीनें-सोन्याच्या व रखांच्या खाणी उत्पन्न केल्या आहेत. या सर्वास कारण त्यांच्यांतलीं कल्पक माणसें व त्यांचे दीर्घ प्रयल. १ १ ल्याप्रमाणे आपण ही दीधे प्रयल केल्यास, आमच्यांत कल्पक माणसे उत्पन्न होतील. ‘हिंमत मर्दा तो मदत खुदा' ही ह्मण आपण लक्षात ठेविली पाहिजे. सांठविलेली संपति किती दिवस पुरणार ! ती