पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. ४१ हें त्याचे काम होतें. निदान पहिली वापरून, योग्यवेळीं फाटली म्हणून दुसरी घेऊन दिली असती, तर गोष्ट वेगळी; पण तसें कांहीं कारण नसतां त्यानें ती दांडगाईनें मोडून टाकली, तर त्यास नवीन छत्री घेऊन देणें वाजवी नव्हतें; त्यास छत्रीची उणीव कळणें जरूर होतें; त्यास त्याच्या अपराधाबद्दल शासन मिळणें जरूर होतें. छत्री नसल्यामुळे किती अडचणी उत्पन्न होतात, चांगल्या वस्तूचा आपण बुद्ध्या नाश केला हें किती गैरशिस्त केलें, ह्या गोष्टी ल्यास कळणें जरूर होतें. मोठी छत्री-पहिल्यापेक्षां अधिक मोठी व सुरेख-घेऊन दिल्यावर या गोष्टी कशा कळणार ? उलट ल्याच्या दांडगाईस उत्तेजन येण्यास मात्र या कृत्याचा उपयोग झाला. मोठ्या किमतीच्या छत्रींत-केवळ शोभेशिवाय किंवा नोकझोंकाशिवाय-काय अधिक आहे ! ‘हांतरूण पाहून पाय पसरणें’ किती अगल्याचे आहे, एका मुलाच्या हौशीकरितां-किंवा हट्टाकरतां-चार माणसांचे अन्न व्यर्थ घालवणें किती मूर्खपणाचे आहे, हें मुलास कळावयास पाहिजे होतें; तें सारें एकीकडे राहून, बापाच्या फाजील लाडामुळे, मुलावर किती वाईट परिणाम घडले पाहा ! आपला इच्छित हेतुतो अयोग्य असतां-तडीस नेण्याकरितां मुलानें नवी छत्री एका दिवसांत मोडली; बापाचा दुप्पट पैसा व्यर्थ घालविला; आपल्याला अव्यवस्थितपणाची संवय लावून घेतली; वडील मनुष्यांची पर्यायानें अवज्ञा केली; याकरितां असल्या फाजील-वेड्या-प्रेमाच्या भरांत सांपडून, आईबापांनी भलल्याच गोष्टींत मुलांचे हट्ट चालू देणें वाजवी नाहीं. २६ मुलांस चांगलें कोणतें व वाईट कोणतें हें कळावें, चांगल्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष लागावें, व वाईट गोष्टींकडे त्यांचे लक्ष लागूं नये, आपल्या प्रेमाचा उपयोग त्यांच्या हिताकडे व्हावा, अहिताकडे होऊं नये, हें लक्षांत ठेवून आईवापांनी मुलांवर प्रेम करावें. मुलांवर उगीच रागावू नये, त्याप्रमाणें वेडें प्रेम पण करूं नये. २७ वर ज्या मुलाची गोष्ट सांगितली, त्या मुलास बापाच्या