पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 о आईबापांचा मित्र. २३ एका मुलाचा बाप अशाप्रकारें मुलगा बिघडला असतां, त्याबद्दल मजजवळ गाच्हाणे सांगूं लागला:-“या मुलाचें कोठे जमत नाही. यास कोठे ठेवल्यास हा तेथे नीट राहात नाहीं, तंटेबखेडे करतो, व फिरून घरीं निघून येतो. यामुळे या मुलाची मला मोठी काळजी लागली आहे. तुम्ही मेहेरबानी करून या मुलास आपल्या बरोबर नेल्यास माझ्यावर तुमचे मोठे उपकार होतील.” हें ऐकून मी त्या मुलाकडे पाहिलें. व “तूं माझ्याबरोबर येण्यास कबूल आहेस काय ?” असें लयास विचारलें. त्यानें येण्याचें कबूल केलें, ह्मणून त्यास मी आपल्या बरोबर घेतलें. २४ तो आईबापांचा एकुलता एक मुलगा होता, ह्मणून त्यास पोंचवण्याकरितां बाप मजबरोबर आला. पावसाळा जवळ आला होता, ह्मणून मुलास छत्री घेऊन देणें जरूर होतें. बापानें मला विचारलें. ‘एक सिंगापुरी छत्री घेऊन द्यावी? असें मीं सांगितलें. मुलगा ‘विलायती पाहिजे’ असें ह्मणत होता. बापानें सिंगापुरी छत्री घेऊन दिली. मुलानें ती छत्री-बाप तेथे आहे तोंच-एका दिवसांत मोडून टाकली, व बापाजवळ विलायती छत्री घेऊन देण्याबद्दल हट्ट चालविला. बापानें दुप्पट पैसे खर्च करून, त्यास विलायती छत्री घेऊन दिली. हें पाहून मला आश्चर्य वाटलें. बापास पगार आठ रुपये मिळत असे. नवराबायकी व तीन मुलें यांचे या पगारांत त्यास पोषण करावें लागे. असें असून मुलाचे लाड-मूखैपणाचे लाड-पुरवण्याकरितां बापानें दोन दिवसांत दीड रुपया खर्च केला, हें लहान आश्चर्य काय ! यापेक्षां आदल्या दिवशीं मुलाच्या हेक्याप्रमाणें एक रुपया खर्च केला असता, तरी बरें झालें असतें ! मुलें आपल्या कह्यांत राहात नाहीत असें ह्मणून हाका मारावयाच्या, पण आपल्या कृतीनें-न समजून कां होईना-त्यांच्या दुर्वृत्तपणाला मदत करावयाची, याला काय ह्मणावें ? अशानें मुलें बिघडतील, नाहींतर ती का ताळ्यावर येतील ? २५ मुलास एक छत्री घेऊन दिली होती, ती एक वर्ष टिकवणें