पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


भाग दुसरा. > ३९ मिळालें, एकटेंच जेवावें लागलें, ह्मणजे आपण केलेल्या अपराधाबद्दल ही योग्य शिक्षा आपल्यास मिळाली, असें त्यास वाटल्याशिवाय राहाणार नाहीं, व त्याच्यावर या गोष्टीमुळे योग्य तो परिणाम झाल्याशिवाय राहाणार नाहीं; ह्यणजे वेडेवांकडे शब्द उच्चारण्याचे सहजच टाळितां येईल. ‘शहाण्यास मार शब्दांचा? अशी ह्मण आहे. पण आपण आपल्या वृत्तीचा नीट उपयोग केल्यास, शब्द उच्चारल्याशिवायही पुष्कळ काम साधितां येईल. आपले बहुमोल शब्द आपण वृथा खर्च कां करावे ? सर्कशींतील प्रोफेसरही-मुक्या प्राण्यांनां-घोड्यासारख्या जनावरांनां-नुसत्या चाबुकाच्या इशारतीनें, वाटेल तसें फिरावयास लावतो, मग आईबापांस आपल्या इंगीतज्ञ संततीस, दृष्टीच्या इशाच्यानें सद्गुण लावण्यास कां अडचण येईल ? २१ एखाद्या मुलास दिलेली वस्तु त्यानें हरविली, अलगजीपणानें हरविली, तर त्यास नवीन वर्तु लागलीच घेऊन देऊं नये. त्या वस्तूत्वांचून आपलें किती अडतें, ही अडचण आपण आपल्या अलगजॉपणानें उत्पन्न केली, असें लयास कळलें पाहिजे. पैसा मिळवण्यास फार श्रम लागतात, ह्मणून त्याचा खर्च बेताबातानें केला पाहिजे, अलगजीपणा चांगला नाहीं, इत्यादि गोष्टींचा चांगला ठसा ल्याच्या मनावर उठल्यावर, मग त्यास दुसरी वसुतु घेऊन द्यावी, ह्मणजे तो आपला निष्काळजीपणा टाकील व आपल्या वस्तूस जपूं लागेल. एक सांडल्यावर दुसरी वतु लागलीच मिळाल्यास, तिची किंमत त्यास कळणार नाहीं, वसुतु हरवल्याबद्दल त्यास वाईट वाटणार नाहीं, त्याच्या दुर्गुणांत कदाचित भर पडेल, व त्यास चांगले वळण लागणार नाहीं. २२ अशा सामान्य गोष्टींकडे आईबाप पुष्कळ वेळां दुर्लक्ष करतात; त्यामुळे त्यांची मुलें हळू हळू बेफाम बनतात, व आईबापांस पुसतनाशीं होतात. ती डोकीवर बसल्यावर आईबापांस आपली चूक कळते, पण मग त्याचा उपयोग बिलकूल होत नाहीं.